Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

दिलायला लोबो: ओशेल ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या तक्रारी

दिलायला लोबो: ओशेल ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या तक्रारी

दैनिक गोमन्तक

शिवोली: शिवोली मतदारसंघातील पाणी समस्येवरून विद्यमान आमदार दिलायला लोबो यांनी सध्या बैठकांचा सपाटा चालवलेला असून शुक्रवारी ओशेल पंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या तक्रारी तसेच सूचना त्यांनी ऐकून घेतल्या. आता ओशेल पंचायत क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या इमारतींपैकी पाच सदनिकांहून अधिक सदनिका असलेल्या इमारत बांधकामांना पाण्यासाठी ना हरकत दाखला देऊ नका,अशी सूचना त्यांनी पंचायत मंडळाला केली. यावेळी त्यांच्यासोबत ओशेलच्या सरपंच वंदना नार्वेकर, पंच सदस्य मंगेश चोडणकर, महादेव हरमलकर तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, एकेकाळी पाण्याचा मुबलक साठा गावात सहज उपलब्ध असलेल्या ओशेल पंचायत क्षेत्रात दिवसेंदिवस मोठमोठे रहिवासी प्रकल्प उभे राहात असल्याने पाण्याचा साठा इतरत्र वळविला जात आहे. त्यामुळे ग्रांमस्थांची पाण्यासाठी फरफट होत असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी आमदार लोबो यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पाणी विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनाही ग्रामस्थांनी फैलावर घेतले.

दरम्यान, ओशेल पंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाशी निगडीत स्थानिक कर्मचाऱ्यांवर कडक पाळत ठेवण्याचे आदेश आमदार दिलायला लोबो यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यांचप्रमाणे पाचहून अधिक सदनिकांचे बांधकाम होत असलेल्या रहिवासी इमारतींना यापुढे नळ जोडणीसाठी (नोंदणीसाठी) पंचायत कार्यालयाकडून ना हरकत दाखला दिला जाऊ नये, असे आवाहन आमदार लोबो यांनी पंचायत मंडळाला केले. या बैठकीत स्थानिक तरुणांसोबत गावच्या ज्येष्ठांनीही भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT