Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

आम्हाला भाजप मधील कोणाला भेटण्याची गरज आहे का ? : दिलायला लोबो

साळगावचे आमदार केदार नाईक यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

पणजी : किमान पाच आमदारांचा गट काँग्रेसमधून बाहेर पडून भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होणार असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे दोन्ही आमदार दिलायला लोबो आणि केदार नाईक यांनी नजीकच्या काळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवांचे खंडन केले आहे.

"आम्हाला कोणीही भेटले नाही," दिलायला लोबो म्हणाल्या आणि हसल्या. त्या पुढे म्हणाल्या, "आम्हाला भाजप मधील कोणाला भेटण्याची गरज का आहे?" या सर्व अफवा आहेत. आमचे सर्व आमदार शाबूत आहेत,” त्या म्हणाल्या. नवनिर्वाचित आमदारांच्या प्रशिक्षण सत्रानंतर गोवा विधानसभेबाहेर लोबो बोलत होत्या.

साळगावचे आमदार केदार नाईक यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले. या सर्व अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. “तसे काही नाही, मला कोणी भेटले नाही, मी कोणाला भेटलो नाही, कोणाशीही चर्चा केली नाही,” केदार म्हणाले.

भाजपमधील आपल्या शुभचिंतकांची भेट घेतली आहे का, असे विचारले असता केदार म्हणाले, माझे सर्वत्र शुभचिंतक आहेत. आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतल्याचे त्यांनी मान्य केले. ते मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र आहेत आणि निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार करायला गेल्याचे निदर्शनास आणून दिले असता, केदार यांनी त्यांची गुप्त भेट घेतली नसल्याचे सांगितले. ते माझे मुख्यमंत्री नाहीत, ते गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT