Goa hideout for criminals Dainik Gomantak
गोवा

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Delhi gangster in Goa: दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहित ऊर्फ पंछी सतत आपली ठिकाणे बदलत होता. मोबाईल वापरासाठी तो कायमच आपल्या वास्तव्यास दूरच्या भागांचा वापर करत असे.

Sameer Panditrao

पणजी: राजधानी दिल्लीत कुख्यात असलेल्या जितेंद्र गोगी टोळीचा प्रमुख सदस्य आणि गुन्हेगारी जगतात ‘पंछी’ म्हणून कुप्रसिद्ध असलेला मोहित याला शुक्रवारी (ता.५) म्हापशात अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या उत्तरेकडील विभागाने ही कामगिरी केली.

मोहित याचा २०१६ मध्ये बहादूरगड येथे दिल्ली पोलिसांच्या ताफ्यावर झालेल्या धाडसी हल्ल्यात हात होता. या हल्ल्यात जितेंद्र गोगीला पोलिस ताफ्यातून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेमुळे गोगी टोळीच्या हिंसक आणि नियोजित गुन्हेगारी कारवायांची झलक मिळाली होती. याप्रकरणी या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहित ऊर्फ पंछी सतत आपली ठिकाणे बदलत होता. मोबाईल वापरासाठी तो कायमच आपल्या वास्तव्यास दूरच्या भागांचा वापर करत असे. याआधी २०१८ मध्ये त्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदाअंतर्गत अटक झाली होती. २०२५ मध्ये बहिणीच्या लग्नासाठी त्याला चार दिवसांच्या अंतरिम जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, तो न्यायालयात हजर राहण्याचे टाळून बेपत्ता झाला आणि न्यायालयाने त्याला फरार जाहीर केले होते.

गेल्या काही महिन्यांपासून तो मुंबई, गोवा आणि कर्नाटकातील विविध ठिकाणी लपून राहत होता. गुन्हे शाखेच्या निरीक्षक रामपाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या खास माहितीवरून ही धडक कारवाई केली. दरम्यान, गोव्यात वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनीही सजग राहून गुन्हेगारी रोखणे गरजेचे बनले आहे.

धक्कादायक वास्तव

ही घटना म्हणजे गोवा राज्य पुन्हा एकदा राष्ट्रीय गुन्हेगारांचे निवासस्थान बनत असल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात अशा टोळ्यांचा शिरकाव आणि अड्डे अधिकाधिक वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव या घटनेमुळे समोर आले आहे.

‘मकोका’अंतर्गत फरार घोषित

दिल्ली पोलिसांचे गुन्हे शाखा उपायुक्त आदित्य गौटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहितने चौकशीत आपली ओळख मोहित ऊर्फ पंछी, रा. गाव- पंछी जतन, गनौर, सोनीपत (हरियाणा) अशी सांगितली.

अलीपूर, दिल्ली येथे ‘मकोका’अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

कोकणात 22 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय मुलीचा खून का केला? घटनास्थळी सापडली नायलॉनची दोरी, कात्री आणि सॅनिटरी पॅड

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa News Live: सुर्ल फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला; रुपेश नाईक आणि अनिकेत नावेळकरला अटक

SCROLL FOR NEXT