Arrested Dainik Gomantak
गोवा

दिल्लीत गफला गोव्यात उद्योग! वेब सिरीज बघून पोलिसांनी केली फसवेबहाद्दर पती पत्नीला अटक

पती-पत्नीने त्यांच्या इतर साथीदारांसह नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीची (NBFC) 22 कोटींची फसवणूक केली आहे.

Pramod Yadav

Delhi Goa Crime NBFC Loan Fraud Case: बनावट कागदपत्रांच्या आधारे दिल्लीतील मालमत्तेवर करोडोंचे कर्ज घेऊन बेपत्ता झालेल्या जोडप्याला आर्थिक गुन्हे शाखेने गोव्यातून अटक केली आहे. विकास शांडिल्य उर्फ ​​शर्मा (48) आणि मीनाक्षी शर्मा (43) अशी आरोपींची नावे आहेत.

पती-पत्नीने त्यांच्या इतर साथीदारांसह नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीची (NBFC) 22 कोटींची फसवणूक केली आहे. असा आरोप त्यांच्यावर आहे.

विकास आणि मीनाक्षी 4.11 कोटी घेऊन गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता होते. पोलिसांनी तपास केला असता त्याचे लोकेशन गोव्यात आढळून आले. दोघेही गोव्यात फूडचेन चालवत होते. वारंवार पत्ता बदलल्याने पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले.

एका वेब सीरिजमधून मिळालेल्या कल्पनेचा आधार घेऊन पोलीस या आरोपींपर्यंत पोहोचले. या दोघांनाही पोलिस कोठडीत घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान सेवा अॅपरल्स नावाच्या कंपनीने रूप नगरची मालमत्ता गहाण ठेवून पाच कोटींचे कर्ज मागितल्याचे निष्पन्न झाले. परंतु एनबीएफसीकडून 4.11 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या खात्यात टाकून कर्जाची रक्कम काढण्यात आली.

यानंतर विकास आणि त्याची पत्नी मीनाक्षी बेपत्ता झाले. त्यांच्या शोध घेण्यासाठी इन्स्पेक्टर किशनवीर सिंग, इन्स्पेक्टर शिखर चौधरी आणि इतरांचे पथक तैनात करण्यात आले होते. तांत्रिक निरीक्षणाच्या आधारे आरोपी गोव्यात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक गोव्यात आले व त्यांनी आरोपींना अटक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT