Mapusa Beef Project Dainik Gomantak
गोवा

म्हापसा मांस प्रकल्पाला मुहूर्त कधी? अद्याप वीजजोडणीच नाही

Mapusa Beef Project : तात्पुरत्या स्टॉल्सची स्थितीही जीर्ण

दैनिक गोमन्तक

म्हापसा : दहा महिन्यांपूर्वी उद्‍घाटन झालेला मांस (बीफ) मार्केट प्रकल्प अजूनही वीजजोडणी नसल्याने कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. परिणामी, व्यापारी सध्या तात्पुरत्या स्टॉल्समधून आपला व्यवसाय करत आहेत, ज्यांची स्थिती बिकट बनली आहे.

प्राप्त माहितीनुसार 14 ऑगस्ट 2021 रोजी म्हापसा पालिकेने या नवीन मांस प्रकल्पाचे उद्‌घाटन केले होते. जुने बांधकाम पाडून याठिकाणी 1.5 कोटी रुपये खर्चून आता नवीन कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे. या प्रकल्पात एकूण 14 नवीन स्टॉल्स आहेत. मात्र, जवळपास दहा महिने उलटूनही हे स्टॉल्स अद्याप सुरू होण्याची कुठलीच लक्षणे दिसत नाहीत.

हे नवीन स्टॉल्स कार्यान्वित होणे बाकी असल्याने परिणामी व्यापाऱ्यांना आकाराने लहान आणि मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या शेजारील तात्पुरत्या स्टॉल्समध्ये त्यांना जुळवून घ्यावे लागत आहे. याशिवाय सध्याच्या तात्पुरत्या स्टॉल्सची स्थितीही दिवसेंदिवस जीर्ण होत चालली आहे. कारण, आतून या स्टॉल्सचे फ्लोअरिंग तुटत आहे. त्यामुळे या स्टॉल्सची स्थिती दयनीय होत चालली आहे. या कालावधीत व्यापाऱ्यांनी विविध प्रसंगी म्हापसा पालिकेकडे नवीन स्टॉल्सचा ताबा देण्याबाबत समस्या मांडल्या आहेत. जेणेकरून ते नवीन प्रकल्पात व्यवसाय सुरू करू शकतील.

या नवीन स्टॉल्सचा ताबा व्यापाऱ्यांना दिला असून, वीज कनेक्शन घेण्यासाठी एनओसीही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नवीन कॉम्प्लेक्ससाठी वापरण्यात येणारा भार पाहता वीज खात्याने या व्यापाऱ्यांना प्रकल्पासाठी स्वतंत्र भूमिगत वीजवाहिन्या ठेवण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी 3 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून, आता या कामाचा निर्णय पालिकेने घेणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT