Mandre Area Dainik Gomantak
गोवा

Mandrem News : मांद्रे परिसरात बेकायदा डोंगर कापणी सुरूच ग्रामस्थांचा विरोध ; पंचायतीकडून पाहणी

स्थानिकांकडून जमिनी घेऊन बिगर गोमंतकीयांनी विकत घेतलेल्या आहे. या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mandrem News : मोरजी, ता. एका बाजूने मांद्रे मतदारसंघात आणि पर्यायाने पूर्ण पेडणे तालुक्यातील जमीन रूपांतर आराखडा रद्द करावा, यासाठी आंदोलन सुरू आहे. तर काही ठिकाणी आजही बेकायदेशीर डोंगर कापणी करून पर्यावरणाची हानी पोचविण्याचे काम सुरू आहे.

अशीच एक डोंगर कापणी मांद्रे पंचायत क्षेत्रातील सच्चे भाटले मांद्रे या माळरानावर सुरू आहे.या डोंगर माळरानावर पूर्णपणे काजूची बागायत आहे. ही जमीनसुद्धा रूपांतरित करून आराखड्यात समाविष्ट केलेली आहे.

स्थानिकांकडून जमिनी घेऊन बिगर गोमंतकीयांनी विकत घेतलेल्या आहे. या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे.

या संदर्भात मांद्रे पंचायतीकडे लेखी स्वरूपात तक्रार आल्यानंतर सरपंच अमित सावंत, पंच प्रशांत नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

सच्चे भाटले मांद्रे या ठिकाणी बेकायदेशीर डोंगर मोठ्या प्रमाणात कापला जात आहे. याविषयी नुकतीच जी मांद्रे या ठिकाणी सभा झाली होती.

त्या सभेमध्ये पंच सदस्य बाळा ऊर्फ प्रशांत नाईक म्हणाले, जमीन रूपांतर आराखड्याचा एक नमुना म्हणून सच्चे भाटले येथील जी काजू बागायतीची जमीन आहे, माळरान आहे.

टीसीपी खात्याने याची चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

बांधकामाला विरोधच!

हा परिसर केवळ बाग काजू बागायतीने नटलेला निसर्ग संपन्न असा परिसर आहे. वादग्रस्त जमीन रूपांतर आराखडा तयार केलेला आहे.

माळरान व येथील जमीन ‘नो डेव्हलपमेंट झोन’ म्हणून गणली जाते. या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू देणार नाही, असा इशारा पंच बाळा ऊर्फ प्रशांत नाईक यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

SCROLL FOR NEXT