Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Government: घरपट्टी आणि व्यापारी कर चुकवणाऱ्यांना दाखले मिळणार नाहीत; सरकारचा निर्णय!

ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टीपासून ते व्यापारी कर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कर ज्यांनी भरलेला नाही, त्यांना दाखले द्यायचे नाहीत, असे सरकारने ठरवले आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टीपासून ते व्यापारी कर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कर ज्यांनी भरलेला नाही, त्यांना दाखले द्यायचे नाहीत, असे सरकारने ठरवले आहे. 191 ग्रामपंचायतींमध्ये किती थकित कर आहे, ते शोधण्याचे कामही पंचायत खात्याने सुरू केले आहे. दरम्यान, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी कर न भरणारे कुठलाही दाखला मागण्यासाठी आले, तर ते अडवून ठेवा, असे स्पष्ट निर्देशच पंचायतीना दिले आहेत.

(Defaulters of rent and business tax will not receive certificates decision of Government)

मंत्री माविन गुदिन्हो यांनी बोगमाळो चिकोळणा पंचायतीला नुकतीच भेट देऊन नवनिर्वाचित सरपंच संकल्प महाले, उपसरपंच लोरिना डिकुन्हा व इतर पंचांशी चर्चा केली. तेथील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. दक्षिण गोवा पंचायत महिला सशक्तीकरण अभियान आणि पॅरीश कौन्सिल ऑफ बोगमाळी यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिरात त्यांनी गरजूंना चष्म्याचे वाटप

केले. पंचायतींमधील थकबाकी भरणा करण्यास बरेचजण उत्सुक नसतात. पण वेगवेगळे दाखले मात्र पंचायतीने विनाविलंब द्यावेत अशी त्याची मागणी असते. ज्यांनी पंचायतीचे कर धकवले आहेत, त्यांना शुल्क भरायला सांगा आणि नंतरच दाखले द्या, असा कानमंत्र मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला आहे.

आर्थिकदृष्टया पंचायती सक्षम व्हाव्यात यासाठी लोकांनी वेगवेगळे कर वेळेत भरावेत, असे आवाहनही मंत्री गुदिन्हो यांनी यावेळी केले.बोगमाळी पंचायत क्षेत्रातील बरेचजण आपल्या करांची रक्कम भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून जाले. याची दखल घेत तिजोरीत महसूल जमा झालाच नाही तर पंचायत चालणार कशी, याचा सर्वांनीच विचार करावा, असे ते म्हणाले.

बोगमाळी येथील एक शैक मालक आम्हाला कर भरण्याची गरज नसल्याचे सांगतो. म्हणजे त्याला सर्व काही फुकट पाहिजे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या शॅकमालकानेआधी आपली पंचायतीकडे असलेली थकबाकीची रक्कम भरावी. नाही तर त्याच्याविरोधात कठोर कायदेशी कारवाई करण्यात येईल, हे मी जाहीरपणे सांगतो, असेही पंचायतमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

थकबाकी वसुलीसाठी उपाययोजना करा!

गोव्यातील १९१ ग्रामपंचायतीमध्ये अनेकांनी कर थकवले आहेत. पंचायतीकडूनही अशा थकबाकीदारांवर कारवाई होत नाही. पंचायत मंत्र्यांच्या विधानानंतर पंचायत खाते अशा थकबाकीदारांची यादी व किती स्वकम थकित आहे, त्याचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्री गुदिन्हो यांनीही पंचायतींनी थकबाकी वसूल करण्याबाबत उपाय करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT