पणजी: एका महिलेची बनावट छायाचित्राद्वारे बदनामी केल्याप्रकरणी सायबर गुन्हा पोलिस विभागाने आज दीपक दलवाई (रा. कर्नाटक) याला अटक केली आहे. अश्लील वेबसाईटवर त्याने पीडित महिलेचा चेहरा दुसऱ्या महिलेला संगणकाद्वारे जोडला होता. तसेच तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केले होते.
(Defamation of woman through fake photo; Suspect jailed)
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक दलवाई याचे तक्रारदार पीडित महिलेच्या बहिणीवर प्रेम होते. पण त्यास पीडित महिला विरोध करीत होती. त्यामुळेच सुडाच्या भावनेने त्याने हे कृत्य केले. सायबर गुन्हा पोलिस पथकाने संशयिताला कर्नाटकातून अटक केली. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले सीमकार्ड व मोबाईल फोन जप्त केला आहे.
पोलिस उपअधीक्षक शिवेंदू भूषण यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक देवेंद्र पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सर्वेश सावंत, हवालदार योगेश खांडेपारकर, शिपाई संयोग शेट्ये, इब्राहिम करोल आणि सायबर गुन्हा शाखेचे शिपाई हेमंत गावकर यांचा समावेश असलेल्या पथकाने प्रकरणाचा यशस्वीपणे तपास केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.