Deepashree Sawant Gavas Arrested Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: सरकारी नोकरीच्या नावाखाली 10.35 लाखांचा गंडा; 'दीपश्री'ला आता पणजी पोलिसांकडून अटक

Deepashree Sawant Gavas Arrested: सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने 10.30 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी दीपश्रीला आता पणजी पोलिसांनी अटक केली.

Manish Jadhav

पणजी: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीय तरुणांना लाखो रुपयांना चुना लावणाऱ्या दीपश्री सावंत गावसच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने 10.30 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी दीपश्रीला आता पणजी पोलिसांनी अटक केली.

फोंडा पोलिसांकडून दीपश्रीला पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले. दीपश्रीच्या विरोधात पणजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दीपश्रीने अनेकांना गंडा घालून कोट्यवधींची माया जमवली आहे. तिच्या बाबतीत रोज नव-नवे खुलासे होत आहेत.

फोंडा कोर्टाचा दणका!

दरम्यान, दहा दिवसांपूर्वीच फोंडा न्यायालयाने दीपश्रीला मोठा झटका देत आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दीपश्रीची 14 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले होते. सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयाकडे पुन्हा एकदा दीपश्रीच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयानेही (Court) पोलिसांनी केलेली मागणी मान्य करत दीपश्रीची पोलिस कोठडीत रवानगी केली होती.

पोलिसांकडून कसून चौकशी

दुसरीकडे, पणजी पोलिस दीपश्रीची कसून चौकशी करत आहेत. दीपश्रीचे राजकीय कनेक्शनही पोलिस शोधत आहेत. राजकीय वरदहस्ताशिवाय दीपश्री एवढा मोठा गंडा घालू शकत नाही असा पोलिसांना संशय आहे. तसेच, दीपश्रीकडून फसवणूक (Fraud) करण्यात आलेल्या तरुणांना पुढे येवून तक्रारी दाखल करण्याचे देखील पोलिस आवाहन करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT