Election Commission Dainik Gomantak
गोवा

नोकऱ्यांमधील भ्रष्टाचाराची निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार; विजय सरदेसाई

गोवा फॉरवर्डच्या तक्रारीचा मसुदा तयार करणे चालू असून सोमवारपर्यंत आम्ही ही तक्रार दाखल करू अशी माहिती दुर्गादास कामत यांनी दिली

दैनिक गोमन्तक

मडगाव (Margao) : अभियंत्यांच्या नोकरीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर (deepak pawaskar) 25 लाख रुपये घेत असल्याची तक्रार भाजपचे पणजीचे आमदार बाबुश मोन्सरात यांनी केल्यानंतर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी सरकारवर टीका करताना हे सरकार मेन्यू कार्ड सरकार हा जो आम्ही आरोप करत होतो त्याला सत्ताधारी आमदारानेच दुजोरा देत असा दावा केला आहे.

विजय सरदेसाई यांनी बाबुशनी केलेल्या आरोपानंतर ट्विट करताना, ह्या भ्रष्टाचारकांडाची आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करूच त्याशिवाय उच्च न्यायालयातही याचिका दाखल करू असे म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाच ट्विट करताना 'न खायेंगे, न खाने देंगे', याचे काय झाले प्रधानमंत्रीजी असा सवाल केला आहे. बाबुश मोन्सरात यांच्या आरोपाने सध्या गोव्याच्या राजकारणात खळबळ माजविली असून सगळीकडून सरकार टीकेचे लक्ष होत आहे. विजय सरदेसाई यांनी यासंदर्भात सरकारवर टीका करताना गोवेकारांना लुटणारे हे सरकार असा आरोप केला आहे. ह्या सरकारने गोव्याची इज्जत वेशीवर टांगली असा आरोप त्यांनी केला.

गोवा फॉरवर्डच्या तक्रारीचा मसुदा तयार करणे चालू असून सोमवारपर्यंत आम्ही ही तक्रार दाखल करू अशी माहिती दुर्गादास कामत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT