Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेस संघटनेत तीव्र असंतोष

कार्यकर्त्यांत नाराजी : फुटीची शक्यता; एकही बैठक नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात कॉंग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून पुढील चार दिवसांत आठ आमदारांच्या भाजप प्रवेशानंतर कॉंग्रेस पक्ष संघटनेतही भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव तसेच दिल्लीतील नेत्यांनाही याचे काहीच पडलेले नसल्याचे एकंदर परिस्थितीवरून वाटते. विधानसभा निवडणुकीनंतर अमित पाटकर या नवख्या उमेदवाराची प्रदेशाध्यक्ष म्हणून तसेच मायकल लोबोंची विधिमंडळ गट नेते म्हणून कोणत्या निकषावर नेमणूक करण्यात आली हे अजूनही स्थानिक नेतृत्वाला कळलेले नाही. त्यानंतर आपल्याच विधिमंडळ गट नेते मायकल लोबो व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर अपात्रता याचिका दाखल करण्याची नामुष्की कॉंग्रेस पक्षावर ओढवली.

(Deep discontent within the Congress organization in goa)

कॉंग्रेसचे नवीन अध्यक्ष अमित पाटकर यांनी संघटना बांधण्याचे काम पाच महिने उलटले तरी हाती घेतले नसून पदाचा ताबा घेतल्यानंतर आजपर्यंत त्यांनी एकदाही आमदार वा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचेही सौजन्य दाखवलेले नाही. दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा अध्यक्षपदी नेमणूक झालेले सावियो डिसिल्वा व वीरेंद्र नाईक यांनीही आजपर्यंत पक्षाची ना बैठक बोलावली ना एखादा कार्यक्रम हाती घेतला. या एकंदर परिस्थितीने आता पक्ष कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी व असंतोष पसरला असून पक्ष संघटनेत उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या बुधवारी ७ सप्टेंबरपासून राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रा सुरू होत असून गोव्यातून एकाही प्रतिनिधीने या यात्रेसाठी नावनोंदणी केली नसल्याचे कळते. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आजारी असल्याचे सांगून ऐनवेळी काल दिल्लीतील ‘महागाईविरोधी रॅली’मध्ये सहभागी होण्याचे का टाळले असा प्रश्नही आता कॉंग्रेसजनांना पडला आहे.

भाजप सरकारच्या एकंदर कारभारावर बोलण्याचे प्रदेशाध्यक्ष सोईस्करपणे टाळतात असा आता कॉंग्रेसजनांचा समज झाला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अमित पाटकरांमध्ये व्यावसायिक नाते असल्यानेच पाटकरांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध सरळ बोलण्याचे टाळले आहे असे सूत्रांकडून समजते.

पक्षाची तिजोरीही झाली खाली

कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी लागणारा निधी आणण्याचे काम अमित पाटकर करतील म्हणूनच त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केल्याचा समज होता, परंतु पाटकरांनी आजपर्यंत एक रुपयाही पक्षासाठी उभा केला नसून वरून निवडणुकांसाठी आलेल्या निधीतील शिल्लक रक्कम खर्च करून तिजोरी खाली करण्याचेच काम केले असल्याचे कळते. कुडचडे येथे राहुल गांधींच्या सभेचा दहा लाखांचा खर्चही पाटकरांनी पक्षाकडून वसुल केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.

पक्ष व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

कॉंग्रेसच्या क्रियाशील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तसेच आमदारांनाही न विचारता थेट दिल्लीहून प्रदेशाध्यक्षांची नेमणूक मायकल लोबोंच्या आशीर्वादानेच झाली होती व अमित पाटकर हे लोबोंच्या खास मर्जीतील असल्याने तेही जाणीवपूर्वक पक्ष व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करतात असे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT