Death Body Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: वेर्णा येथे रेल्वे ट्रॅकशेजारी कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ

हा मृतदेह पुरुषाचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: वेर्णा येथील कोकण रेल्वे ट्रॅक परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह पुरुषाचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हा घातपात आहे की, अत्माहत्या या बाबत अजुन कोणतीही माहिती मिळालेली नाही.

(Decomposed death body found at Verna)

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आंबेघाट येथे एका मोठ्या पॉलिथिनच्या गोणीतून एका मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. महिनाभरापूर्वी मुलीची हत्या झाली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून हा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला आहे.

सांगे येथे कुजलेल्या अवस्थेतील एका मुलीचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

नेत्रावळीहून कोणकोणला जाणाऱ्या आंबेघाट येथे रस्त्याच्या बाजूला एका पिशवीत केपे पोलिसांना महिलेची हाडे सापडल्याने लोकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिं.5 रोजी दुपारी एक पर्यटक त्या रस्त्याने जात असताना लघुशंका करण्यासाठी थांबला असता त्याला एका पिशवीत हाडे असल्याचे दिसून आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, केपे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता एका पिशवीत हाडे असल्याचे दिसून आल्याने त्या हाडांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावून घेण्यात आले.

ही हाडे मानवी असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी संबंधीत मृतदेह ताब्यात घेतला आहे. आज दि.6 रोजी शवचिकित्सा करण्यासाठी पाठवली असता ही हाडे महिलेची असल्याचे सिद्ध झाले आहे. सदर महिलेचा खून दुसऱ्या ठिकाणी करून तो आंबेघाट येथील सुनसान रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले असून केपे पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT