Goa Cashew News Dainik Gomantak
गोवा

Cashew Season Goa: लागवड वाढली, उत्पादन कमीच! यंदाही काजू हंगामाची स्थिती बिकट; असंतुलित हवामानाचा बसतोय फटका

Cashew Production Goa: काही वर्षांपासून शेती-बागायतींचे नैसर्गिक संकटे आणि वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. कुठल्याही प्रकारचे पीक घ्यायचे ठरविले तरी असंतुलित हवामानाचा त्याला फटका बसतोच.

Sameer Panditrao

पणजी: मागील काही वर्षांतील काजू उत्पादनाची आकडेवारी पाहता जेवढ्या मोठ्या प्रमाणात काजूची लागवड करण्यात आली आहे त्या तुलनेत काजू उत्पादनात मात्र वाढ झालेली नाही. त्याउलट सातत्याने उत्पादनात घट होत असून त्याचा फटका काजू उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सद्यस्थितीत सुमारे ३० टक्‍क्यांनी काजू उत्पादनात घट असल्याचे मत कृषी अधिकारी व्यक्त करत आहेत.

यंदा जून महिन्यापर्यंत काजूचा हंगाम असण्याची शक्यता आहे; कारण अजूनही काही भागात मोहोर धरत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेती-बागायतींचे नैसर्गिक संकटे आणि वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. कुठल्याही प्रकारचे पीक घ्यायचे ठरविले तरी असंतुलित हवामानाचा त्याला फटका बसतोच.

अतिउष्मा काजूच्या मोहोराला मारक ठरत आहे. पूर्वीची स्थानिक जुनी काजूची झाडे जे उत्पादन देतात त्या तुलनेत नव्याने लावलेल्या काजूच्या कलमांची योग्य काळजी घेऊनही योग्य उत्पादन मिळत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.

२०० रुपये हमीभाव करा!

यंदा काजूला सुरुवातीपासूनच चांगला भाव आहे. सध्या १६३ रुपये प्रतिकिलो दर दिला जातोय. त्यामुळे जर चांगले उत्पादन आले असते तर शेतकऱ्यांच्या मिळकतीतही वाढ झाली असती. यंदा काजूला १७० रुपये किलो हमीभाव देण्यात आला आहे. या हमीभावात वाढ करत २०० रुपये प्रतिकिलो दर द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT