Goa Bird Migration Dainik Gomantak
गोवा

Bird In Goa: गोव्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत घट

Bird In Goa:...ही तर धोक्याची घंटा: पक्षी निरीक्षक, संशोधकांनी व्यक्त केली भीती

दैनिक गोमन्तक

Bird In Goa: गोव्यात यंदाच्या हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. उत्तर गोलार्धातून राज्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे पक्षी निरीक्षक आणि संशोधकांनी धोक्याची घंटा असल्याचा इशारा दिला आहे.

गोवा पक्षी संवर्धन नेटवर्कने केलेल्या सर्वेक्षणानुसार, हिवाळ्याच्या महिन्यांत स्थलांतरित पक्ष्यांच्या 180 हून अधिक प्रजाती गोव्याला भेट देतात, ज्यामुळे राज्याच्या पक्षी विविधतेत भर पडते. तथापि, घटणारी संख्या चिंताजनक स्थिती सूचित करते.

गोव्यात सामान्यतः आढळणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बदके, गीस, हंस, हॅरियर्स, पायपिट्स, लीफ वार्बलर, प्लवर्स, सँडपायपर, इबिसेस, डार्टर्स आणि स्टारलिंग्स आहेत. दुर्दैवाने, यापैकी अनेक प्रजाती कमी होत चालल्या आहेत.

ही घट होण्यामागील कारणे गुंतागुंतीची आहेत आणि त्यात नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, कृषी पद्धतीतील बदल, हवामानातील बदल, प्रदूषण, स्थलांतरित पक्ष्यांची उड्डाण मार्गावरील शिकार आणि रोग यांचा समावेश होतो, त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासात व्यत्यय येतो,असे तज्ज्ञांचे मत आहे.

शहरीकरण,औद्योगिकरण पक्ष्यांच्या मुळावर !

शहरीकरण, औद्योगीकरण आणि वृक्षतोडीमुळे होणारी अधिवासाची हानी, स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वपूर्ण धोका म्हणून उदयास येत आहे, ज्यामुळे त्यांच्या विश्रांती, खाद्य आणि प्रजननासाठी तडजोड करावी लागत आहे.

पाणी आणि कीटकनाशक-केंद्रित नगदी पिकांकडे वळणा-या कृषी पद्धतींतील बदलांमुळे स्थलांतरित पक्ष्यांवर अधिक परिणाम झाला आहे, ज्यामुळे पर्यावरणात बदल होऊन त्यांच्या अन्न स्त्रोतांवर आणि आरोग्यावर परिणाम झाला आहे, असे तज्ज्ञांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT