decision will be taken for the good of the constituency and Goa by trusting the people, Vijay Sardesai Dainik gomantak
गोवा

गोव्यातील पराभवावर मंथन करणं आवश्यक; विजय सरदेसाई

लोकांना विश्वासात घेऊन मतदारसंघाच्या व गोव्याच्या भल्याचा निर्णय घेण्यात येईल; विजय सरदेसाई

दैनिक गोमन्तक

राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर आरोप प्रत्यारोप कमी होताना दिसत आहेत. राज्यात अनेक पक्षांनी 2010 पासून सत्तेवर असणाऱ्या भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी कंबर कसली होती. मात्र भाजपने 2017 पेक्षा यावेळी जास्त जागा मिळवल्या आणि निकालावेळीच 3 अपक्ष उमेदवारांनी आपला पाठिंबा भजपला दिला. त्यामुळे भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला.

दरम्यान, इतर पक्षांनी आणि नेत्यांनी जनेतेचा निर्णय मान्य केला आहे. दरम्यान गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई (Vijay Sardesai) म्हणतात की, दुसर्‍याकडे बोट दाखवण्याऐवजी एकजूटीनंतर अपयश का आले यावर विचार होणे गरजेचे आहे. फातोर्डावासीयांकडून (Fatorda) अनेक सूचना येत आहेत. लोकांना विश्वासात घेऊन मतदारसंघाच्या व गोव्याच्या भल्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आता ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यावेळी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) गोवा फॉरवर्डला फक्त एक जागा मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत गोवा फॉरवर्डने 3 जागा मिळवल्या होत्या. यावेळी फक्त एकच जागा मिळल्याने पुढील निर्णय हा लोकांना विश्वासात घेऊन मतदारसंघाच्या व गोव्याच्या भल्याचा घेण्यात येईल अस मत यावेळी विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये युती केलेल्या काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्‍ये (Goa Forward) आता चकमक उडायला सुरू झाली आहे. या दोन्‍ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, एकमेकांवर आरोप-प्रत्‍यारोप करू लागले आहेत. काँग्रेसचे (Congress) उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी गोवा फॉरवर्डबरोबरच्‍या युतीमुळे पक्षाला नुकसान झाल्याचा आरोप केला होता. त्‍यास प्रत्‍युत्तर देताना आज गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर आणि संतोषकुमार सावंत यांनी भिके यांच्‍या वक्तव्‍याचा जाहीर निषेध करत युतीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT