Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

सोपो ठेकेदाराला तीन महिने शुल्कमाफीचा निर्णय!

पालिका प्रशासनाकडे दाद मागणार: नगरसेवकांचा इशारा

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव नगरपालिकेने गुरुवारच्या बैठकीत सोपो ठेकेदाराला कोविड काळासाठी शुल्कमाफी तसेच त्याला आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याबाबत घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला आहे. काही नगरसेवकांनी त्याविरुध्द पालिका प्रशासनाकडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे.शुल्कमाफी निर्णयामुळे पालिकेला साधारण तीस लाख रू. फटका बसेल, असा दावा करून भाजप समर्थक नगरसेवकांनी पालिका बैठकीतून सभात्याग केला होता. अनेकांनी हे निर्णय कोणावर तरी मेहेरनजर करणारे व पालिकेला फटका देणारे असल्याचे सांगितले.

नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी मात्र कोविड काळांत सर्व व्यवहार बंद होते व त्यामुळे झालेल्या नुकसानीचा विचार करून हा निर्णयझाल्याचे सांगितले.सदर ठेकेदाराला दिलेल्या मुदतवाढीमुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण या तीन महिन्यात आंब्यांचा हंगाम तसेच होली स्पिरिट चर्च फेस्त येते व त्याचा लाभ देण्यासाठीच ही मुदतवाढ दिल्याचा आरोप होत आहे.यावेळी मिलाग्रीस यांनी आपण दहा लाख रू. वाढवून बोली देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यावर मुख्याधिका-यांनी पालिकेचा निर्णय झाल्याचे स्पष्ट केले.

निविदा प्रक्रिया रद्द: आग्नेलो फर्नांडिस

पालिकेने सोपो गोळा ठेक्यासाठी मागविललेल्या निविदांची तारीख दोन दिवसावर आली असता ही मुदतवाढ दिली गेली आहे. दरम्यान, या सोपो निविदेसाठी अर्ज केलेल्या बोलीदारांनी आज पालिकेत येऊन मुख्याधिका-यांची भेट घेतली असता त्यांनी पालिकेने निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी त्यांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

SCROLL FOR NEXT