Goa Medical College Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College: वैद्यकीय पदव्युत्तर आरक्षणविरोधी याचिकेवर आज खंडपीठाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज ठेवला आहे.

दैनिक गोमंतक

Goa Medical Student: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2023 -24 साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण ठेवण्याच्या गोवा सरकारने 5 मे 2023 रोजी घेतलेल्या निर्णयाला वैद्यकीय पदवी विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली.

त्यावरील निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज शुक्रवार, 11 रोजी ठेवला आहे. त्यामुळे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून पदव्युत्तर अभ्यासाच्या प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचे याकडे लक्ष लागून आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी असलेल्या जागा आरक्षणासाठी न ठेवता त्या सर्वसामान्य गटातून भरण्यात याव्यात.

सरकारने अनुसूचित जाती व जमाती तसेच इतरमागासवर्गीय विद्यार्थ्यांना जागा आरक्षित ठेवण्याचा घेतलेला निर्णय गोवा खंडपीठाने रद्द करावा, अशी मागणी याचिकेत केली होती.

हे आरक्षण ठेवताना सरकारकडे आवश्‍यक डेटा तसेच पुष्टी देणारा दस्तावेज नाही.

हे आरक्षण कोणत्या आधारावर ठेवले आहे, याबाबत स्पष्टीकरण नाही. हे आरक्षण ठेवल्यास या अभ्यासक्रमासाठी पात्र गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.

कमी गुण असलेल्या एससी,एसटी तसेच ओबीसी गटातील विद्यार्थ्यांना या जागा देऊन हुशार विद्यार्थ्यांना जागा मिळण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

...तर 34 जागा सर्वसाधारण गटास

या याचिकेवरील निर्णय होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार नाही, अशी माहिती सरकारतर्फे आज न्यायालयाला युक्तिवादावेळी देण्यात आली.

पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया येत्या 14 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने गोवा खंडपीठाने त्यावर तातडीने काल व आज सुनावणी घेतली.

गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी 121 पैकी 61 जागा उपलब्ध आहेत. आरक्षण दिल्यास 61 पैकी फक्त 34 जागा सर्वसाधारण गटासाठी उपलब्ध होणार आहे. हा अन्याय असल्याचा दावा याचिकेत मांडण्यात आली होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT