Deccan Odyssey 2.0 Dainik Gomantak
गोवा

Deccan Odyssey 2.0: गोवा, मुंबई, बनारस, आग्रा, जयपूर; शाही डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 पुन्हा सेवेत, पर्यटकांची चंगळ

डेक्कन ओडिसी 2.0 ट्रेनमध्ये उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात येतात.

Pramod Yadav

Deccan Odyssey 2.0 Train: आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी 2.0 या ट्रेनचा गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक 18 येथे शुभारंभ होणार आहे.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, भारतीय रेल्वेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मान्यवरांना घेऊन ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे असा प्रवास करणार आहे.

देशातील प्रसिद्ध 4 शाही रेल्वेपैकी एक असणारी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 ही नव्या रुपात पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहे. या ट्रेनमध्ये उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात येतात.

सन 2004 ते 2020 पर्यंत या आलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, सध्या डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयीसुविधांनी पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरू होत आहे.

या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्रा व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. यात गोवा, मुंबई, बनारस, आग्रा, जयपूर ते सिलिगुडी यासह विविध पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांचा समावेश आहे.

असे आहेत नवे मार्ग

1) महाराष्ट्र स्पेलंडर - मुंबई सीएसएमटी - नाशिक - औरंगाबाद - पाचोरा -कोल्हापूर - मडगाव - सावंतवाडी

2) इंडियन सोजर्न - मुंबई सीएसएमटी-वडोदरा-उदयपूर-जोधपूर-जयपूर-आग्रा-सवाई माधोपूर-दिल्ली

3) इंडियन ओडिसी - दिल्ली- सवाई माधोपूर - आग्रा- जयपूर -उदयपूर-वडोदरा-मुंबई सीएसएमटी

4) हेरिटेज ओडिसी -- दिल्ली-आग्रा-सवाई माधोपूर-उदयपूर-जोधपूर-जैसलमेर-जयपूर-दिल्ली

5) कल्चर ओडिसी -- दिल्ली-सवाई माधोपूर-आग्रा-जयपूर-आग्रा-ग्वाल्हेर-झाशी-खजुराहो-वाराणसी-दिल्ली

6) महाराष्ट्र वाईल्ड ट्रेल--- मुंबई सीएसएमटी- छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)-रामटेक-वरोरा-पाचोरा-नाशिक-मुंबई सीएसएमटी

7) दार्जिलिंग मेल- मुंबई सीएसएमटी-वडोदरा-उदयपूर-सवाई माधोपूर-जयपूर-आग्रा-बनारस-सिलिगुडी

8) दार्जिलिंग मेल रिटर्न -- सिलीगुडी-बनारस-आग्रा-सवाई माधोपूर-जयपूर-उदयपूर-वडोदरा-मुंबई सीएसएमटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT