Panajim Municipal Corporation Dainik Gomantak
गोवा

Goa: महापालिका बैठकित महापौर आणि विरोधी नगरसेवकात खडाजंगी

विरोधी गटाचे ज्येष्ठ नगरसेवक उदय मडकईकर (Uday Madakaikar) व सुरेंद्र फुर्तादो (Surendra Furtado) यांनी सत्ताधारी मंडळावर विविध आरोपाच्या फैरी सोडत बैठकीत चर्चेला आलेले ठराव संमत करण्यास आक्षेप घेतला.

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी महापालिकेची (Panajim Municipal Corporation) आज झालेली बैठक अपेक्षेप्रमाणे गाजली. विरोधी गटाचे ज्येष्ठ नगरसेवक उदय मडकईकर (Uday Madakaikar) व सुरेंद्र फुर्तादो (Surendra Furtado) यांनी सत्ताधारी मंडळावर विविध आरोपाच्या फैरी सोडत बैठकीत चर्चेला आलेले ठराव संमत करण्यास आक्षेप घेतला. मात्र बहुतमताच्या जोरावर सत्तधारी मंडळाने सर्व ठराव संमत केले.

महापौर रोहित मोन्सेरात (Mayor Rohit Monsera) यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमहापौर वसंत आगशीकर, महापालिका आयुक्त फर्नांडिस व इतर सर्व नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. पणजी मार्केट इमारतीचा तिसरा टप्पा बाधण्याच्या जी सुडाच्या प्रस्तावावर चर्चा सुरु होताच हल्लीच कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी महापौर उदय मडकईकर (Uday Madakaikar) व ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो (Surendra Furtado) यांनी जोरदार आक्षेत घेतला व तिसऱ्या टप्प्यातील दुकाने कुणाला देणार त्यांची यादी अगोदार जारी करा व नंतरच तिसऱ्या टप्प्यतील बंधकामाला सुरुवात करा. अशी मागणी केली. यावेळी सत्ताधारी नगरेसवकांनी विकास कामाला विरोध करु नका, अशी सुचना मृडकईकर यांना केली. मात्र मडकईकर हातात माईक घेऊन तावातावाने बोलत राहीले. त्यामुळे नवखे असलेल महापौरही गप्प झाले.

पणजीतील नॅशनल थियेटरच्या जागी व्यावसायीक प्रकल्प उभा करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावालाही मडकईकर व फुर्तादो यांनी आक्षेप घेतला व सदर जागा बिल्डराच्या घश्‍यात घालण्याचा महापालिकेचा डाव असल्याचा आरोप केला. इतर विषयाच्या ठरावाच्यावेळीही विरोधक व सत्ताधारी यांच्यात वादावादी झाली. मात्र 30 नगरसेवकात 25 नगरसेवकांचा पाठिंबा असलेल्या सत्ताधारी मंडळाने विरोधकांचा विरोध डावलून बैठकीत चर्चेला आलेल्या सर्व सातही विषयावरील ठराव संमत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT