Hit and Run Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Death: चिंबल 'हिट अँड रन'मध्ये एकाचा मृत्यू; आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात...

ओल्ड गोवा पोलिसांनी व्यंकटेश जाधवला ताब्यात घेतले आहे

दैनिक गोमन्तक

Hit and Run Accident News: राज्यात अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. यामध्ये अनेक 'हिट अँड रन'च्या घटनाही वाढल्या आहेत. नुकतेच चिंबलमध्ये झालेल्या हिट अँड रनच्या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चिंबल येथे रविवारी रात्री एका रिक्षाची धडक एका दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीस्वार अजय कांबळे (वय 30, चिंबल) हे जबर जखमी झाले होते. धडक दिल्यानंतर चालक व्यंकटेश जाधव (29, सांताक्रुझ) याने घटनास्थळावरून पळ काढला.

जखमी अजय कांबळे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी व्यंकटेश जाधवला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, सांगे येथे रविवारी दुपारी कार अपघातात एक दांपत्य बचावले. या स्वयंअपघातात कारचे नुकसान झाले. एका कारमधून फोंडा येथील दांपत्य प्रवास करीत होते. त्यांची कार दांडो, सांगे येथे दिवाणी न्यायालयाजवळ आली असता स्लीप झाली. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिने विजेच्या खांबाला धडक दिली. या स्वयंअपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: 'मोदी माझे गुरु' आरोग्यमंत्री राणेंचा पंतप्रधानांसाठी खास व्हिडिओ, म्हणाले "मी सामान्य कार्यकर्ता"

Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

Human Animal Conflict: नेमकं हद्दीत घुसलंय कोण? माणूस की हत्ती?

Anganwadi: 'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्‍युइटी, पीएफ, पेन्‍शनसह टॅबही द्यावा'! श्रीपाद नाईकांना निवेदन सादर

GCA: जीसीएच्या कर्मचाऱ्यांचा बोलका जल्लोष; क्रिकेट क्लबांनी शिकवलेले शहाणपण

SCROLL FOR NEXT