Death body found pernem  Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक; नयबाग येथे आढळला लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह!

अग्नीशमन दलाच्या जवांनानी मृत देह ओहळातुन वर काढून पेडणे पोलीसांच्या स्वाधीन केला.

दैनिक गोमन्तक

पेडणे: नयबाग येथे महामार्गाच्या पुला जवळ असलेल्या ओहळात आज अज्ञात व्यक्तीचा मृत देह सापडला आहे.स्थानिकांनी याची माहिती पेडणे पोलीस ठाणे व अग्नीशमन दलास दिल्यावर अग्नीशमन दलाच्या जवांनानी मृत देह ओहळातुन वर काढून पेडणे पोलीसांच्या स्वाधीन केला.

(death body was found in pernem)

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून अंगावर फक्त तबकिरी रंगाचा टी शर्ट आहे तर कमरेखालील भाग व पायाचे सुसरिनी लचके तोडलेल्या अवस्थेत हा मृत देह आहे.पेडणे पोलीसांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात पाठवला आहे.

औद्योगिक वसाहतीत एका गटारात अनोळखी इसमाचा मृतदेह

शुक्रवारी सकाळी वेर्णा औद्योगिक वसाहतीत एका गटारात एक अनोळखी इसम पडला असल्याची माहिती वेर्णा पोलिसांना देण्यात आली.

वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या अनोळखी इसमाला गटारातून वर काढले असता तो मृतावस्थेत आढळला. या मृत व्यक्तीची अजून ओळख पटली नसून वेर्णा पोलिस पुढील तपास करत आहेत. सदर मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT