Crime News Gomantak Digital News
गोवा

Goa Crime News : सावंतवाडीतील युवकावर गोव्यात प्राणघातक सुरी हल्ला; दोघा संशयितांना अटक

राज्यात गुन्हेगारी कारवायांचे प्रमाण वाढतच चालले आहे

Rajat Sawant

राज्यात गुन्हेगारी कारवायांचे प्रमाण वाढतच चालले आहे. बुधवारी हणजूण येथे एका 25 वर्षीय तरुणीचा दोघांनी विनयभंग करून तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तसेच काही दिवसांपूर्वी मडगाव येथे रेणुका बहादूर या महिलेवर गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती.

दरम्यान आज सकाळी पणजीतील मिरामार येथे सिंधुदूर्गातील एकावर प्राणघातक सुरी हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा युवक सिंधुदूर्गातील सावंतवाडी तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील युवकांवर पणजीतील मिरामार, टोंक येथे सुरी हल्ला झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले असून याप्रकरणी पणजी पोलिसांनी दीपक जोशी परीयार (19, करंजाळे) व दीपक उपेंद्र परीयार (18, पणजी) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात दोन अल्पवयीन युवकांचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

Goa Mankurad Mango: 5 हजारांवरून दर थेट 800 रुपयांवर, स्वस्त झाला 'मानकुराद'! येत्या आठवड्यात दर अजून कोसळण्याची शक्यता

Goa Water Crisis: ...तर सत्तरीवर पाण्याचे संकट, अंजुणेत 29 टक्‍के पाणी; इतर धरणांत 2 महिने पुरेल इतका साठा

खरी कुजबुज: विरोधकांच्‍या भूमिकेबाबत पुन्‍हा संभ्रम!

Panjim: पणजीतील असुरक्षित इमारत आजही पाडणार, धूळ नियंत्रणासाठी पाण्याचा मारा

SCROLL FOR NEXT