

पणजी: महानगरपालिकेची असुरक्षित इमारत (शुक्रवार) पासून पाडण्यास सुरुवात झाली. इमारत पाडण्याचे काम सुरू होते, पाडलेल्या बांधकाम साहित्याचा धुरळा उडू नये, म्हणून त्यावर पाण्याचा मारा करण्यात येत होता.
काल साडेनऊ वाजल्यापासून कंत्राटदाराने जेसीबीच्या साह्याने इमारतीत चा भाग पाडण्यास सुरुवात केली. तीन मजल्याचे स्लॅब तोडून टाकण्याचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीसाठी बंद केलेला रस्ता आजही बंदच ठेवण्यात आला होता. एका बाजूने मात्र ये-जा लोकांना ये-जा करता येत होती. महानगरपालिकेचे कर्मचारी या कामावर सध्या लक्ष ठेवून आहेत.
फाल्कन अपार्टमेंट या इमारतीला जोडून असल्याने सामाईक भिंत सोडून बाजूचा असुरक्षित भाग पाडण्यात येत आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयात गाळेधारकांना महानगरपालिकेने हमी दिल्यानंतर दुपारनंतर इमारत पाडण्याचे काम गतीने सुरू झाले. इमारत सर्व खाली केल्यानंतरच मातीचे ढीग उचलले जातील, असे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. सुटीच्या दिवशी म्हणजे रविवारीही हे पाडकाम केले जाणार आहे.
साहित्याची चोरी!
काल दुपारनंतर बांधकाम पाडल्यानंतर रात्री जे काही लोखंडी सळई व इतर लोखंडी साहित्य इमारत पाडताना निघाले होते, ते मध्यरात्री चोरट्यांनी पळविल्याची घटनास्थळावर चर्चा होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.