Crime Dainik Gomantak
गोवा

नदीत सापडला कुजलेला मृतदेह; ओळख पटवणेसुद्धा झाले मुश्किल, उत्तरीय तपासणीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून

Goa Crime: सिकेरी किनाऱ्यावर अज्ञात महिलेचे शीर सापडले होते, ते याच महिलेचे असावे असे गृहीत धरून त्याची डीएनए चाचणी करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News

फोंडा: आमोणे-खांडोळा येथील मांडवी नदीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने तो ओळख पटविण्याच्या पलीकडे गेला होता.

विशेष म्हणजे, या मृतदेहाचे डोके तसेच एक पाय गायब झाला असून तो कुजल्यामुळे तुटून पडला असावा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस स्थानकाला माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी तो इस्पितळात पाठविला आहे.

एक महिला बेपत्ता असल्याने त्यासंबंधीची शहानिशा करण्यासाठी या महिलेचे नातेवाईक घटनास्थळी आले. मात्र, त्यांनी ती बेपत्ता असलेली ही महिला नसल्याचे सांगितले.

डीएनए चाचणीची मागणी

यापूर्वी सिकेरी किनाऱ्यावर अज्ञात महिलेचे शीर सापडले होते. ते याच महिलेचे असावे, असे गृहीत धरून त्याची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT