Deadbody Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बाजारात पार्क केलेल्या टेम्पोत आढळला 55 वर्षीय महिलेचा मृतदेह; खुनाचा संशय, पोलिस, फॉरेन्सिक पथक दाखल

Goa Crime News: डिचोली बाजारात पार्क केलेल्या टेम्पोत ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

Pramod Yadav

डिचोली: बाजारात पार्क करण्यात आलेल्या टेम्पोत शुक्रवारी (२६ डिसेंबर) ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली. महिलेचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. डिचोली पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, डिचोली बाजारात टेम्पो पार्क करण्यात आला आहे. या टेम्पोत सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिला ५५ वर्षीय असून, तिचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. डिचोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. पोलिसांनी एका संशयिताला देखील ताब्यात घेतले आहे.

महिलेची ओळख अद्याप पटली नसून, मृत्यूचे कारण देखील अस्पष्ट आहे. अधिकच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. शवविच्छेदनानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे. सकाळी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बाजार परिसरात भीतीचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT