Dayanad Samajik Suraksha Dainik Gomantak
गोवा

DSSS: जिवंत व्यक्तींना दाखविले मृत, ‘समाजकल्याण’चा अजब कारभार; ‘डीएसएसएस’ लाभार्थ्यांत संताप

Dayanad Samajik Suraksha: समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि संचालक अजित पंचवाडकर यांना या घटनेची दखल घ्यावी लागली आहे. त्यांनी याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.

Sameer Panditrao

पणजी: समाजकल्याण खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या (डीएसएसएस) लाभार्थ्यांविषयी अजब घटना घडली आहे. खात्यातर्फे लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यात हयातीत असणाऱ्यांनाही मृत घोषित केल्याची घटना पुढे आली आहे.

विशेष बाब म्हणजे खात्याने संबंधित कुटुंबाला घेतलेली रक्कम परत करण्याचे पत्रच पाठविले आहे; परंतु संबंधित लाभार्थी अजूनही जिवंत असल्याचे उघड झाल्याने समाजकल्याण खात्याचे झटकन डोळे उघडले आहेत.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि संचालक अजित पंचवाडकर यांना या घटनेची दखल घ्यावी लागली आहे. त्यांनी याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.

या प्रकरणावरून सरकारी खात्यातील कामकाज कशाप्रकारे चालते, याचे हे दिसून आले. ‘डीएसएसएस’चा लाभ ज्येष्ठ नागरिक, एकटी महिला, विधवा आणि अपंग व्यक्ती घेतात. यामध्ये एकटी राहणारी महिला ही १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची, घटस्फोटीत, नवऱ्याने सोडून दिलेल्या महिला, तसेच ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अविवाहित महिलांचा समावेश आहे.

ताळगाव येथील नागाळी परिसरात राहणाऱ्या द्रौपदी तिवरेकर यांना समाजकल्याण खात्याने केलेल्या सर्वेक्षणात मृत म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच डिसेंबर २०२४ पासून त्यांना दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत जे महिनाकाठी दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा होत होते, ते बंद झाले. त्यामुळे त्याविरोधात त्यांनी आवाज उठवला आणि त्या हयातीत असल्याचे समोर आले.

दुसरा प्रकारही तिसवाडी तालुक्यातीलच आहे. पीटर करंबोळी-ताळगाव येथील घर क्र. ११६ मध्ये राहणाऱ्या ९२ वर्षीय क्लाऊडिना डोमिंगो वारेल्ला या महिलेलाही मृत म्हणून दाखविण्यात आले आहे. त्यांची मुलगी ॲना फर्नांडिस यांनी नुकताच समाजकल्याण खात्याच्या कार्यालयात येऊन आवाज उठवला.

आपल्या आईला मृत कसे घोषित केले, ती अजूनही जिवंत आहे. मार्च २०२४ चे पत्र काही दिवसांपूर्वी आपणास भेटले. त्यात पैसे खात्यात पाठविण्याचे बंद केल्याचे व अतिरिक्त आलेली रक्कम परत करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे आपण कार्यालयात येऊन विचारणा केल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांच्या भावनांशी खेळू नका!

तिवरेकर यांचे नातेवाईक शेखर कुट्टीकर यांनी सरकारी कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. कुट्टीकर यांनी सांगितले की, कोणतीही सखोल चौकशी न करता असे परिपत्रक पाठवू नये. असा प्रकार इतर कोणाबाबत घडू नये, म्हणून आम्ही हा आवाज उठवला आहे.

खात्याला पैसे द्यायचे नसेल तर देऊ नयेत पण अशा प्रकारचे परिपत्रक पाठवून लोकांना दुःखी करू नका. विभागाकडून चूक झालेली आहे, त्यांनीच ती सुधारावी आणि तिवरेकर यांचे पैसे खात्यात भरावे, अशी मागणी कुट्टीकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT