Funeral  Dainik Gomantak
गोवा

मुलीने केले वडिलांचे अंत्य संस्कार

विर्नोडा-पेडणेतील घटना : समाजाला समानतेचा संदेश

दैनिक गोमन्तक

मोरजी: आजच्या काळात मुलगा व मुलगी यांमध्ये कोणताही भेदभाव करु नये, हा सामाजिक संदेश देणारी घटना पेडणे तालुक्यातील विर्नोडा गावात घडली. मुलगी आणि वडील दोघेही वकिली क्षेत्रात कार्यरत असताना आपला व्यवसाय सांभाळतानाही सामाजिक बांधिलकी ओळखून मुलगी व वडिलांनी समाजासाठी काम केले. त्यांच्या मुलीने वडिलांच्या निधनानंतर पार्थिवाला ‘अग्नी’ही दिला. विर्नोडा-पेडणे येथील ज्येष्ठ वकील नारायण पोरोब हे म्हापसा (Mapusa) येथे व्यवसाय निमित्ताने स्थायिक झाले होते. अवघ्या 55 वर्षे असताना त्यांचे निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने त्यांची मुलगी नंदिता ही देखील सुशिक्षित वकिली क्षेत्रात कार्यरत होती. तिने स्वतः धैर्याने पित्यांचे सर्व अग्निसंस्कार केले.

पेडणे तालुक्यातील असा एक गाव आहे, त्या गावात एकही दारूचे दुकान नाही, तो गाव म्हणजे विर्नोडा. याच गावातील नारायण पोरोब या जन्मदात्या पित्याच्या मृत्युनंतर मुलगी नंदिता हिने अग्नी देत समाजाला वेगळी दिशा देण्याबरोबरच स्त्री-पुरुष समानतेचा नवा संदेश दिला. प्रत्येक क्षेत्रात आजची महिला आपल्या कर्तबगारीने आपल्या कार्याचा ठसा उमटवत असल्या तरी आजही काही रूढी परंपरा ग्रामीण भागात, समाजात तशाच टिकून असल्याचे दिसून येते. मात्र, या सावित्रीच्या लेकीने ही चौकट ओलांडून आपल्या कार्याने समाजासमोर स्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आहे.

धाडशी पाऊल

ग्रामीण भागात आजही प्रथा रूढीपरंपरा अंधश्रद्धा चालू आहे. एखाद्या पुरुष किंवा स्त्रीचा मृत्यू झाला तर स्मशानभूमीत सहजासहजी स्त्रियाना प्रवेश नसतो, किंवा स्त्रिया (Women) जात नाही. एखाद्या गावात ग्रामीण भागात ज्या गावाच्या रूढी परंपरा किंवा त्या प्रवाहाच्या विरुद्ध कोणी गेले, तर त्यांच्याच विरोधात काही लोक बंड करायला पुढे सरसावतात, मात्र रूढी परंपरा बदलण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. नंदिताचे हे धाडशी पाऊल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT