डिचोलीतील 'तो' वाहतूक सिग्नल दिवसांतून दोन तास बंद राहणार कारण...

सभापती राजेश पाटणेकर यांनी शनिवारी वाहतूक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
Traffic Signal
Traffic Signal Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: सोमवारपासून शाळांना प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने, विद्यार्थी आणि पालकांच्या सोयीसाठी शहरातील शांतादुर्गा विद्यालयासमोरील वाहतूक सिग्नल सकाळी आणि दुपारी मिळून दोन तास बंद राहणार आहे. येत्या सोमवारपासून या निर्णयाची कार्यवाही होणार आहे. सभापती राजेश पाटणेकर यांनी शनिवारी आपल्या कार्यालयात घेतलेल्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

Traffic Signal
'त्या' सर्व ठिकाणांचा कायापालट करणार: सुदिन ढवळीकर

या बैठकीस शांतादुर्गा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि डिचोली वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सुदेश वेळीप उपस्थित होते.

शहरातील वाहतूक सिग्नलच्या जवळपास शांतादुर्गा प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय आहे. शांतादुर्गा विद्यालयात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मिळून जवळपास बाराशे विद्यार्थी आहेत. त्यामुळे शाळा भरतेवेळी आणि सुटण्याच्या वेळेत विद्यालयासमोरील जंक्शनवर विद्यार्थी आणि पालकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. यावेळेत वाहतूक सिग्नल चालू राहिल्यास रस्ता पार करताना गोंधळ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून त्यावर उपाययोजना काढावी. अशी विनंती शांतादुर्गा विद्यालयाच्या व्यवस्थापनाने सभापतींकडे केली होती. त्याला अनुसरून सभापती श्री. पाटणेकर यांनी वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याबरोबर या मुद्यावर चर्चा केली. पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी सकाळी एक आणि दुपारी एक मिळून दोन तास वाहतूक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतूक सिग्नल बंद असताना शांतादुर्गा समोरील जंक्शनवर वाहतूक पोलिस नियंत्रण ठेवणार आहेत.

Traffic Signal
लहान मुलांचा कर्करोग बरा होऊ शकतो: डॉ. महादेव स्वामी

सिग्नल बंदची अशी आहे वेळ

शाळा भरतेवेळी सकाळी 7:30 ते 8:30 आणि दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे. सिग्नल बंद ठेवण्यात येणार असले, तरी सकाळी आणि दुपारच्या वेळेत वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी सिग्नलजवळील जंक्शनवर वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय अधूनमधून भायलीपेठ ते शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत वाहतूक पोलिस (Traffic Police) गस्त घालणार आहेत.

शांतादुर्गा व्यवस्थापन समाधानी

विद्यार्थी (Students) आणि पालकांचा (Parents) गोंधळ टाळण्यासाठी वाहतूक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शांतादुर्गा परिवारचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी समाधान व्यक्त केले आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यासाठी व्यवस्थापन मंडळ तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com