नार्वेतील ऐतिहासिक शिवकालीन श्री सप्तकोटीश्वर मंदिर परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली. Dainik Gomantak
गोवा

ऐतिहासिक शिवकालीन श्री सप्तकोटीश्वर मंदिर परिसरात दरड कोसळली

श्री सप्तकोटीश्वर मंदिर परिसरातील श्री भगवती देवीच्या मंदिरामागे असलेल्या भक्त निवासाच्या पायथ्याकडील दरड समोरच टेकून असलेल्या देवस्थान कार्यालय इमारतीच्या मागच्या बाजूने कोसळलेली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मागील आठवड्यात झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीचा तडाखा (heavy rains) डिचोली (Bicholim) तालुक्यातील नार्वे गावालाही बसला असून, नार्वेतील ऐतिहासिक शिवकालीन श्री सप्तकोटीश्वर मंदिर (Historical Shiva-era Sri Saptakotishwar Temple) परिसरात दरड कोसळण्याची घटना (Incidence of pain collapse) घडली आहे. या घटनेत मोठा अनर्थ घडला नसला, तरी मंदिराच्या भक्त निवास आणि कार्यालय इमारतींना धोका निर्माण झाला आहे.

श्री सप्तकोटीश्वर मंदिर परिसरातील श्री भगवती देवीच्या मंदिरामागे असलेल्या भक्त निवासाच्या पायथ्याकडील दरड समोरच टेकून असलेल्या देवस्थान कार्यालय इमारतीच्या मागच्या बाजूने कोसळलेली आहे. अतिवृष्टीमुळे धार्मिक महत्व असलेल्या श्री सप्तकोटीश्वर मंदिरासमोरील तळीच्या संरक्षक कुंपणाचीही काहीशी पडझड झाली आहे. सध्या दरड कोसळली त्याठिकाणी ताडपत्रीचे आच्छादन टाकण्यात आलेले आहे. त्यातच पाऊसही ओसरल्याने दरडीची आणखी पडझड टळली आहे. तरी पुन्हा कोसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास धोका संभवण्याची शक्यता आहे.

पुरातत्व खात्याकडून पाहणी

या घटनेची माहिती मिळताच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी नार्वे येथे येवून कोसळलेली दरड आणि अन्य पडझडीची पाहणी केलेली आहे. पडझडीची छायाचित्रेही टीपलेली आहेत.

याठिकाणी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नाही, तर मोठा इतिहास असलेल्या श्री सप्तकोटीश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक खाणाखुणांना धोका निर्माण होण्याचा संभव नाकारता येत नाही.

शिवकालीन इतिहासाची साक्ष

नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिर आणि तेथील खाणाखुणा शिवकालीन इतिहासाची साक्ष देत आहेत. सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा इतिहासात उल्लेख आहे. छत्रपती शिवरायांचे मंदिर परिसरात वास्तव्य होते, त्याचा पुरावा दर्शविणाऱ्या खाणाखुणाही त्याठिकाणी आहेत. श्री सप्तकोटीश्वर मंदिरासह तेथील परिसर राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे संवर्धन व्हावे. या हेतूने पुरातत्व खात्यातर्फे या मंदिराला नवा साज देण्याचे काम हाती घेण्यात आहे. हे काम करताना पूर्वीच्या बांधकाम आराखड्यात मात्र बदल करण्यात आलेला नाही. पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण होण्याची आशा आहे.

व्यवस्थित संवर्धन व्हावे

गोमंतकातील नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर देवस्थान हे कदंब काळापासून राजदैवत म्हणून ओळखण्यात येत आहे. हे मंदिर म्हणजे गोमंतकाचे वैभव तेवढेच मानाचे प्रतीक आहे. या मंदिरासह तेथील ऐतिहासिक खाणाखुणा सुरक्षित राहणे महत्वाचे आहे. राज्य सरकारकडून या ऐतिहासिक वास्तू आणि परिसराचे संवर्धन व्हावे.

-सचिन मदगे, इतिहास अभ्यासक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आग दुर्घटना! नाईटक्लब मालक लुथरा बंधुंचा जेलमधील मुक्काम वाढला, पोलिस कोठडीत चार दिवस वाढ

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग हाऊसफुल! 31 डिसेंबरसाठी पर्यटक पडले बाहेर; गोवा-कोकणाकडे वळली पावले

"मला जो गोवा आवडतो, तसा तो राहिला नाही"! सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत; स्थानिक म्हणाला, 'आम्ही रोज या परिस्थितीला तोंड देतोय'

Minor girl Assault: नराधम बस चालकाचे घृणास्पद कृत्य! 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपी बक्षीला 4 दिवसांची पोलीस कोठडी

गोमंतकीय मातीतलं 'ख्रिस्तपुराण'! जेव्हा येशूची जन्मकथा ओवीबद्ध मराठीत अवतरली...

SCROLL FOR NEXT