Usgaon Bridge Dainik Gomantak
गोवा

Dangerous Road in Goa : उसगावचा चौपदरी पूल अंधारात; अपघाताचा धोका वाढला

उत्तर आणि दक्षिण गोवा जोडणाऱ्या उसगावच्या चौपदरी पुलावर ऐन दिवाळीत काळोख पसरल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Dangerous Road in Goa : उत्तर आणि दक्षिण गोवा जोडणाऱ्या उसगावच्या चौपदरी पुलावर ऐन दिवाळीत काळोख पसरल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील पहिला चौपदरी पूल भामई - उसगावात कार्यरत झाला. त्यामुळे या भागातील प्रवासी वाहतूक सुरळीत झाली, पण ऐन दिवाळीत या चौपदरी पुलावरील पथदीप लागत नसल्याने परिसरात रात्रीच्यावेळेला काळोख पसरला आहे.

उसगावचा हा चौपदरी पूल खाण कंपन्यांच्या संघटनेने उभारला होता. खाण व्यवसाय जोरात होता, त्यावेळेला जुन्या एकेरी उसगावच्या पुलावर कायम वाहतूक कोंडी होत होती. त्यानंतर काळाची गरज ओळखून खाण कंपन्यांनीच पुढाकार घेऊन हा चौपदरी पूल उभारला. मात्र, खाण कंपन्यांच्या दुर्दैवाने खाण उद्योगावर न्यायालयाने हातोडा मारल्याने गेली दहा वर्षे हा व्यवसाय बंद आहे.

खाण उद्योग बंद झाल्यानंतर या पुलाकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, सहा महिन्यांपूर्वी या पुलाची रंगरंगोटी व पथदीप उभारून हा पूल चकाचक करण्यात आला होता, पण ऐन दिवाळीत मात्र पथदीप लागत नसल्याने काळोखाचे साम्राज्य पसरले आहे.

सरकारच्या संबंधित खात्याने याप्रकरणी त्वरित लक्ष देऊन उसगावच्या चौपदरी पुलावरील पथदीप रात्रीच्या वेळी कायम पेटतील याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी उसगाव व पाळीवासीयांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT