Goa News |NH 66 Dainik Gomantak
गोवा

Goa News: दांडीवाडो-चिंचोणेवासीयही चवताळले!

राष्ट्रीय हमरस्ता विस्तारामुळे दक्षिण गोव्यात दांडीवाडो-चिंचोणे येथील लोक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: राष्ट्रीय हमरस्ता विस्तारामुळे भोमा आणि खोर्ली येथील नागरिक संतापले असतानाच आता दक्षिण गोव्यात दांडीवाडो-चिंचोणे येथील याच कारणास्तव लोक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय हमरस्ता ‘66-अ’साठी आता या भागात आणखी जमीन संपादित करण्यासाठी सरकारने नोटीस जारी केल्याने लोक आणखीनच भयभीत झालेले आहेत.

दांडीवाडो-चिंचोणे हा अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग आहे. हा रस्ता या दाट लोकवस्तीतून न नेता त्यासाठी बगलमार्गाचा पर्याय अवलंबावा अशी स्थानिकांची मागणी आहे. या रस्त्यामुळे संपूर्ण गाव मधोमध विभागला जाणार आहे.

त्याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 45 मीटर जागा सेटबॅक म्हणून ठेवली जाणार असल्याने गावात बांधकामासाठी जागाच शिल्लक राहणार नाही असा लोकांचा दावा आहे.

या गावातील लोकांनी आज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी त्यांच्याबरोबर स्थानिक सरपंच वालेंतीन बार्रेटो, उपसरपंच शर्मिला ग्रासियस, पंच कॉलिन परेरा व फ्रँक व्‍हिएगस उपस्‍थित होते.

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारात मंत्री असलेले विजय सरदेसाई यांनी या पर्यायी बगलमार्गाला मंजुरी मिळवून दिली होती. मात्र सरदेसाई सत्तेबाहेर गेल्यावर हा पर्याय गुंडाळून ठेवण्यात आला असे बार्रेटो यांनी सांगितले. या भागात सरकार उड्डाणपूल बांधून हमरस्ता बांधू पाहत आहे, असे ते म्‍हणाले.

...तर न्‍यायालयात जाऊ : विजय सरदेसाई

भाजप हे डबल इंजीन सरकार लोकांना विश्वासात न घेता आपल्याला हव्या तशा स्‍वरूपात विकास लोकांच्या माथी मारू पाहत आहे. भोमा येथे सरकार जे करू पाहत आहे, तेच येथेही करू पाहत आहे.

सरकारला स्वस्तातला पर्याय देऊनही तो न स्वीकारता हा खर्चिक प्रकल्प पुढे रेटण्‍यामागे कंत्राटदारांचा फायदा आहे का? या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीत जाण्याची आपली तयारी आहे. तिथेही काम झाले नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा पर्यायही आम्ही खुला ठेवला आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Theft: 1 नाही, 2 नाही.. तब्बल 5 दुकाने फोडली! केरी-सत्तरीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिक चिंताग्रस्त

Satyapal Malik: घटनात्मक पदावर असतानाही सरकारविरुद्ध उघडपणे बोलणारे, बेधडक सत्य सांगणारे 'सत्यपाल मलिक'

Palolem Nagarse: कोमुनिदादच्या जागेत घातले कुंपण, जमीन हडपण्याचा प्रयत्न; नगर्से-पाळोळेतील नागरिक संतप्त

Goa: 'कर्ज काढून सण साजरे केले नाहीत', मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; मतदारसंघासाठी 100 कोटींची तरतूद केल्याची दिली माहिती

Rashi Bhavishya 06 August 2025: तांत्रिक कामे किंवा इलेक्ट्रॉनिक बाबतीत दक्षता घ्या, आरोग्याकडे दुर्लक्ष नको

SCROLL FOR NEXT