Damodar Naik
Damodar Naik Dainik Gomantak
गोवा

Damodar Naik: 'पीएफआय'चे समर्थन करणाऱ्या राजकारण्यांवर कारवाई निश्चित

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून देशासह गोवा राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय ) संघटनेवर देशविघातक कृत्य करत असल्याचा ठपका ठेवत या संघटनेचे समर्थक, कार्यकर्त्यांची केंद्र सरकारने धरपकड सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही राजकारणी पीएफआयचे समर्थन करत असल्याची माहिती समोर येत आहे. अशा राजकारण्यांवर राज्य सरकार निश्चित कारवाई करेल असे भाजप नेते दामोदर नाईक यांनी म्हटले आहे.

(Damu Naik told Some politicians are found supporting PFI govt to act against anti-nationals )

राष्ट्रीय तपास संस्था आणि स्थानिक पोलीस पीएफआयच्या नेत्यांची चौकशी करत आहेत. "हळूहळू, कोणते राजकीय नेते पीएफआयला समर्थन देत आहेत हे समोर येत आहे. पीएफआयचे समर्थन करणाऱ्या देशद्रोहींना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. यात कोणालाही राज्य सरकार तडजोड करणार नाही असे नाईक म्हणाले ते मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत आज भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलत होते.

याबरोबरच नाईक यांनी गोव्यात राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांची ओळख पटवण्यासाठी आधीच कारवाई सुरू आहे. तसेच राज्य सरकारने अमली पदार्थांच्या विरोधात वेगाने कारवाई केली आहे, त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक जप्ती आणि अटक झाल्या आहेत. आता सरकारने अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत तडजोड केलेली नाही आणि जे धर्मांतराच्या कार्यात सामील होतील त्यांना ही तडजोड करणार नाही असे ही ते म्हणाले.

यावेळी कोणाचेही नाव न घेता नाईक म्हणाले की, "स्वयंघोषित विरोधी पक्षनेता" सरकारच्या विरोधात विधाने करत आहे, आणि आपली निराशा बाहेर काढत आहे. यातून ते चुकीच्या राजकीय कथा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्ये ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. असा टोला ही त्यांनी राज्यातील राजकिय नेत्याला लगावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT