Madgaon Mayor Election | Damodar Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Madgaon Mayor Election : तिढा सुटणार; दामोदर शिरोडकर होणार मडगावचे नवे नगराध्यक्ष

एकच उमेदवारी अर्ज आल्याने बिनविरोध निवड होणार, उद्या औपचारिक घोषणा

सुशांत कुंकळयेकर

Madgaon Mayor Election : भाजपचे दामोदर शिरोडकर मडगावचे नगराध्यक्ष होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. मडगावचे नगराध्यक्ष बनण्याचा दामोदर शिरोडकर यांचा मार्ग खुला झाला असून आज त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आल्यात जमा झाले आहेत. या संबंधीची औपचारिक घोषणा उद्या बोलाविलेल्या बैठकीत केली जाणार आहे.

नगराध्यक्ष निवडण्यासाठी उद्या होणारी निवडणूक हात दाखवून केली जाणार असल्याने विरोधी गटाने या निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने त्यांनी आपला उमेदवार उभा केला नाही. शिरोडकर यांनी आज एकूण तीन उमेदवारी अर्ज भरले. त्यांना दामोदर वारंग, कामिलो बार्रेटो आणि रोनिता आजगावकर यांनी अनुमोदन दिले.

यापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीत दामोदर शिरोडकर याना गोवा फॉरवर्डचे उमेदवार घनःश्याम शिरोडकर यांच्या कडून 15 विरुध्द 10 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी भाजपच्याच 5 नगरसेवकांनी विरोधी मतदान केले होते. त्यानंतर पुन्हा अशी बंडाळी होऊ नये म्हणून भाजपच्या 17 ही नगरसेवकांना काल रात्री बेतालभाटी येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्या सर्वांना परस्पर पालिकेने आणले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT