Nilmani Phookan & Damodar Mauzo Dainik Gomantak
गोवा

दामोदर मावझो यांनी दुसरे ज्ञानपीठकार निलमणी फुकान यांची घेतली भेट

ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते निलमणी फुकान (Nilmani Phookan) यांची दुसरे ज्ञानपीठकार असलेले गोव्याचे साहित्यिक दामोदर मावजो यांनी गुवाहाटी जवळ असलेल्या एका निसर्गरम्य गावात भेट घेतली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: प्रसिद्ध आसामी कवी आणि 57 व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते निलमणी फुकान (Nilmani Phookan) यांची दुसरे ज्ञानपीठकार असलेले गोव्याचे साहित्यिक दामोदर मावजो (Damodar Mauzo) यांनी गुवाहाटी जवळ असलेल्या एका निसर्गरम्य गावात भेट घेतली. यावेळी दोन साहित्यिकांमध्ये साहित्यावर तर गप्पा झाल्याचं त्याशिवाय 1980 साली फुकान यांनी गोव्याला भेट दिली होती त्याच्याही आठवणी जाग्या झाल्या.

गुवाहाटी येथे आयोजित केलेल्या आसाम बुक फेस्टिव्हलच्या निमित्ताने मावजो आपली पत्नी शैला यांच्यासह सहभागी झाले त्यावेळी त्यांनी फुकान यांची त्यांच्या घरी भेट घेतली. 1980 साली गोव्यात साहित्य अकादमीने गोव्यात पुरस्कार वितरण सोहळा ठेवला होता. या सोहळ्याला फुकान उमाशंकर जोशी (Umashankar Joshi) यांच्या बरोबर गोव्यात (Goa) आले होते. त्यावेळच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. त्यावेळी आपण गोव्यावर तीन कविता लिहिल्या होत्या असे त्यांनी सांगितले.

मावजो यांनी त्यांच्या कुटुंबिया बरोबरही गप्पा केल्या. हल्लीच्या दिवसात कविता फारसे कुणी वाचत नाहीत अशी खंत यावेळी फुकान यांनी मावजो यांच्यासमोर मांडली असता कविता वाचणारे अवघेच असले तरी ते चोखंदळ रसिक वाचक असतात असे त्यांना मावजो यांनी सांगितल्यावर त्यांचीही कळी खुलली.

आसाम येथे भरलेल्या बुक फेस्टिव्हल बद्दल बोलताना मावजो यानी प्रत्येक दिवशी 25 हजार लोक या पुस्तक उत्सवाला भेट देत होते. अगदी तिकीट काढून आत प्रवेश करत होते. अवघ्या 5 दिवसात तिथे 25 कोटींच्या पुस्तकांची विक्री झाली असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pitbull Dog Attack: चिंबल येथे पिटबूल कुत्र्याचा हल्ला; 10 वर्षांची लहानगी गंभीर जखमी

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT