primary school repair reveals government documents Dainik Gomantak
गोवा

Pernem: छप्पर दुरुस्तीला काढले, पावसाने भिजली सरकारी कागदपत्रे; साबांखाचा हलगर्जीपणा उपजिल्हाधिकारी कार्यालयाला नडला

Bhirone Primary School: भिरोणे येथील सरकारी शाळेच्या इमारतीचे छप्पर दुरुस्तीसाठी काढल्यामुळे पावसात भिजलेली कागदपत्रे ही पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयातील असल्याचे उघड झाले आहे.

Sameer Panditrao

पेडणे: भिरोणे येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छप्पर दुरुस्तीसाठी काढल्यामुळे पावसात भिजलेली कागदपत्रे ही पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयातील असल्याचे उघड झाले आहे. त्यात महत्त्वपूर्ण दस्तऐवज तसेच विविध खटल्यांचे निकाल आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

पेडणे येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक जागा नसल्यामुळे २०१७ -१८ मध्ये पेडणेचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर यांनी तत्कालीन उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन व शिक्षण खात्याची परवानगी घेउन पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयातील काही कागदपत्रे गडेकरभाटले, भिरोणे येथील सरकारी प्राथमिक शाळा इमारतीच्या एका खोलीत सुरक्षित ठेवली होती.

त्यात कागदपत्रांनी भरलेली काही लोखंडी कपाटे, काही भिंतीला असलेली कपाटे तर कागदपत्रांच्या फाईल्सचे गठ्ठे रचून ठेवण्यात आले होते.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या शाळा इमारतीचे दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत बांधकाम विभागाने हाती घेतले. मात्र या इमारतीतील साहित्य तसेच आत राहू दिल्याने गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसात हे सर्व साहित्य भिजले आहे.

निष्काळजीपणामुळे प्रकार ; नाईक

याबाबत पेडण्याचे उपजिल्हाधिकारी शिवकुमार नाईक यांना विचारले असता, या शाळेतील साहित्याची योग्य निगा घेणे ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाचे काम होते. परंतु त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे. ही कागदपत्रे महत्त्वपूर्ण आहेत. जी कागदपत्रे भिजलेली आहेत, ती कशी वाचवता येतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Accident: राज्यात रस्ते अपघातात वाढ, 2022 पासून आतापर्यंत 843 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

Pakistan: 'सात पाऊले चल, मग गोळी मार...', पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचा थरकाप, जोडप्याचा VIDEO व्हायरल!

Goa Assembly: अर्थसंकल्पीय भाषणात आमदार गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा; वाचा दिवसभरातील घडामोडी

3.50 लाख रुपये देऊन गोव्यात मिळवली पोस्टमनची नोकरी; 40 गोमंतकीयांना कमी करुन 50 महाराष्ट्रातील उमेदवारांची भरती - सरदेसाई

SCROLL FOR NEXT