Pernem: काळ आला होता पण..! पेडणे बाजाराजवळ ट्रकचा ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली दुर्घटना

Pernem Market Truck Accident: पेडण्याचा आठवड्याचा बाजार, त्यातच रस्त्यावर वाहनांची वर्दळ. अशा स्थितीत एका मोठ्या उतरणीवर ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले.
Truck Accident
Truck Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: पेडण्याचा आठवड्याचा बाजार, त्यातच रस्त्यावर वाहनांची वर्दळ. अशा स्थितीत एका मोठ्या उतरणीवर ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. अशा स्थितीतही ट्रकचालक सॅमसन डिसोझा याने धाडसाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या धाडसी कामगिरीबद्दल लोकांकडून सॅमसनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी जीए०३-के-४६९८ या क्रमांकाचा ट्रक दगड घेऊन येत होता. पेडणे आयटीआय ते न्यायालय इमारतीपर्यंत सुमारे दोन किलोमीटर लांबीची तीव्र उतरण आहे. ही उतरण संपण्यास सुमारे अडीचशे ते तीनशे मीटर अंतर बाकी असताना अचानक या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.

या ट्रकच्या पुढे आणखी एक ट्रक आणि त्यापुढे बरीच वाहने होती. या सगळ्यांना वाचविणे आवश्यक होते. तसाच ट्रक पुढे गेला दगडांनी भरलेला ट्रक बाजारात घुसण्याची शक्यता होती. चालक सॅमसन याने धैर्याने ट्रकचे स्टेअरिंग करकचून धरले. आपलेच काय होईल ते होवो; पण लोकांना काहीही होऊ देणार नाही, असा विचार करून त्यातल्या त्यात सोयीस्कर जागा दिसल्यावर त्याने ट्रक डाव्या बाजूला वळविला.

Truck Accident
Queeninagar Accident: क्विनीनगरात मोठा अपघात! चालकाचा ताबा सुटून खासगी बस उलटली; वाहक जागीच ठार, 32 प्रवासी जखमी

सॅमसनने रस्त्यावरून ट्रक बाजूला काढला. सुमारे अर्धा मीटरच्या गटारावर चढून ट्रक रस्त्यापासून खाली सुमारे दहा मीटर खोल अंतरावर दाट जंगलात जाऊन स्थिरावला. आश्चर्याची बाब, म्हणजे चालकाला काहीही न होता तो सुखरूप बचावला.

Truck Accident
Goa Swing Accident: झोपाळ्यावरील खेळ जीवावर बेतला; हरवळ्यात गळफास लागून अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

त्याचबरोबर ट्रकचेही अजिबात नुकसान झाले नाही. नंतर हा ट्रक क्रेनच्या साहाय्याने काढण्यात आला. ट्रकचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाचे अनेकांनी कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com