Pakistan: 'सात पाऊले चल, मग गोळी मार...', पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचा थरकाप, जोडप्याचा VIDEO व्हायरल!

Pakistan Honor Killing: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे.
Pakistan Honor Killing:
Pakistan CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Honor Killing: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. येथे एका तरुण-तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 13 जणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुण-तरुणीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध एकमेकांशी लग्न केले होते.

घटनेनंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट

सोशल मीडियावर हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) या घटनेवरुन संतापाची लाट उसळली आहे. सामान्य नागरिकांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांनीच दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या घटना स्वीकारार्ह नाहीत, असे लोकांचे म्हणणे आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, काही लोक एका तरुण-तरुणीला गाडीतून बाहेर काढून एका निर्जन, वाळवंटी भागात घेऊन जातात आणि नंतर पिस्तूलने त्यांच्यावर गोळ्या झाडतात. त्यानंतर त्यांच्या मृतदेहांवरही गोळ्या झाडल्या जातात. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, "व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेल्या तरुण-तरुणीची ओळख बानो बीबी आणि एहसानुल्लाह अशी झाली आहे."

व्हिडिओमध्ये, तरुणीने आपले डोके शालने झाकले असून तिला एक धार्मिक ग्रंथ दिला गेला आहे. तो घेऊन ती एका निर्जन टेकडीकडे जाते आणि जमाव तिच्याकडे पाहत राहतो. यावेळी तरुणी एका व्यक्तीला म्हणते, "माझ्यासोबत सात पाऊले चल, त्यानंतर तू मला गोळी मारु शकतोस." तो काही पाऊले चालतो, त्यानंतर तरुणी म्हणते, "तुला फक्त मला गोळी मारण्याची परवानगी आहे. बस एवढेच."

मुख्यमंत्री सरफराज बुगती यांची प्रतिक्रिया

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी सोमवारी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. या हत्येप्रकरणी 13 संशयितांना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारचे प्रवक्ते शाहीद रिंद यांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास सुरु आहे.

गेल्या वर्षी, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून अशाच हत्येचे प्रकरण समोर आले होते. जिथे एका व्यक्तीने आपल्या बहिणीची आणि तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने हत्या केली होती. ही भयानक घटना लाहोरपासून सुमारे 375 किलोमीटर दूर असलेल्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील अलीपूर तहसीलमध्ये घडली होती. हत्येनंतर आरोपीने पोलिसांसमोर (Police) शरणागती पत्करली होती. दुसरीकडे, या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेतून पाकिस्तानला परतलेल्या एका व्यक्तीने कबूल केले होते की, त्याने आपल्या किशोरवयीन मुलीची हत्या केली, कारण ती टिक-टॉक व्हिडिओ न बनवण्याचे त्याचे म्हणणे ऐकत नव्हती.

पाकिस्तानमधील 'ऑनर किलिंग'ची भयावह स्थिती

पाकिस्तानात दरवर्षी मोठ्या संख्येने अशाप्रकारे लोकांची हत्या केली जाते. आकडेवारीनुसार, महिला सर्वाधिक बळी ठरतात. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या (Human Rights Commission of Pakistan) मते, येथे दरवर्षी सुमारे एक हजार महिलांची हत्या केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com