water is flowing into the fields Dainik Gomantak
गोवा

Mapusa: बंधाऱ्याला भगदाड, मयडेत शेती पाण्याखाली

नाल्यातील गाळ त्रासदायक : तातडीने दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: आताफोंड-कालिझर बंधाऱ्याला (Ataphond-Kalizhar dam) तीन किलोमीटरपर्यंत भगदाड पडल्याने नदीचे पाणी ओसंडून शेतांमध्ये वाहात आहे. परिणामी भातशेती पाण्याखाली गेल्याने मयडे गावातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने या बंधाऱ्याची ताबडतोड दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

आताफोंड-कालिझर बांध हा मयडे गावातील प्रमुख बांधांपैकी एक आहे. तो नदीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधलेला असून, त्यामुळे येथील शेतीचे संरक्षण होते. माती संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे. अंदाजपत्रक तयार करून ते शासनाला सादर करणार आहेत. सरकारने या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी टेनंट असोसिएशनचे अध्यक्ष फिलीप डिसोझा यांनी केली आहे.

वारंवार भगदाडे पडण्याचे प्रकार

सध्या हा बांध कमकुवत झाला आहे. परिणामी, विविध ठिकाणी भगदाड पडल्याने नदीचे पाणी शेतात घुसत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आताफोंड-कालिझर टेनंट संघटनेने तीन किलोमीटरपर्यंत हा पट्टा स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आणि बंधाऱ्यावरील आठ ठिकाणी दुरुस्तीही केली. तरीही पुन्हा भगदाड पडण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सध्या शेती करणे कठीण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT