Betel Nut Loss Dainik Gomantak
गोवा

जोरदार पावसामुळे सुपारी उत्पादकांना फटका! सर्वत्र कच्च्या फळांचा खच; नुकसानग्रस्तांना भरपाईची अपेक्षा

Betel Nut: मोठ्या प्रमाणात फळे झडून पडत आहेत त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या पावसाचा सत्तरीतील सुपारी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात फळे झडून पडत आहेत. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून फळ धरलेल्या सुपारीची झाडे पावसाचा मारा सहन करू शकत नसल्याने हिरवी कच्ची फळे मोठ्या प्रमाणात गळून पडत आहे.

सध्या बागायतींत गळून पडलेल्या कच्च्या फळांचा खच दिसून येत आहे. याचा मोठा फटका बागायतदारांना बसणार आहे. गेल्या आठ दिवसांत प्रचंड प्रमाणात फळे गळून पडली आहेत.

सुपारीची गळती रोखण्यासाठी फवारणी केली जाते पण संततधारेमुळे फवारणीचा काही फायदा होताना दिसत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात कच्ची सुपारी गळून पडली आहे.

फळ गळतीमुळे सुपारी उत्पादकांचे यंदा मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सरकारने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्‍यक आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई वेळीच मिळायला हवी.

जोरदार पाऊस सुरू असल्याने पोफळीच्या पिकावर याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. हिरवी सुपारीची फळे मोठ्या प्रमाणात गळत आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात परिपक्व झालेली सुपारी फळांची काढणी केली जाते, परंतु आताच हिरवीच फळे गळत असल्याने उत्पादन घटणार आहे.
विष्णू गावकर, बागायतदार, वाळपई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT