Daji Salkar Dainik Gomantak
गोवा

Daji Salkar : नागरिकांनी कर भरल्यास पालिका कामगारांना वेतन

स्वच्छतेसाठी सहकार्य करा; मुरगाव पालिकेला 110 कचरापेट्या

दैनिक गोमन्तक

शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी नागरिकांनी कचरा रस्त्याकडेला न टाकता घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या कामगारांकडे द्यावा. प्रत्येकाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे. तसेच मुरगाव पालिकेचे विविध कर, भाडेपट्टी इत्यादींची थकबाकी त्वरित फेडावी जेणेकरून मुरगाव पालिकेच्या कामगारांना वेतन वितरित करता येईल, असे आवाहन वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी केले.

एका खासगी कंपनीतर्फे मुरगाव पालिकेला 110 कचरा पेट्या देण्यात आल्या. या कचरा पेट्या मुरगाव पालिकेच्या स्वाधीन करण्याच्या सोहळ्याप्रसंगी आमदार साळकर बोलत होते. याप्रसंगी मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेवक गिरीश बोरकर, दामोदर कासकर, प्रजल मयेकर, विनोद किनळेकर, दीपक नाईक, शमी साळकर व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

मुरगाव पालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होत नसल्याने कामगारांना वेळेवर वेतन देता येत नाही. जे थकबाकी भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्याविरोधात वेळप्रसंगी कडक कारवाईही करण्यात येईल, असे साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT