Panaji Smart City : महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणतात, ‘स्मार्ट सिटीच्या कामांबाबत सर्वसामान्यांची तक्रार नाही’

स्मार्ट सिटीच्या कामांबाबत सध्या पणजी महानगरपालिका आणि खासकरून मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर टीका होत आहे.
Babush Monserrate | Panaji Smart City
Babush Monserrate | Panaji Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Smart City : स्मार्ट सिटीच्या कामांबाबत सध्या पणजी महानगरपालिका आणि खासकरून मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर टीका होत आहे. परंतु ज्यांना पणजी शहर प्रगतिशील झालेले बघायचे आहे, ते विकासकामांना विरोध करणार नाहीत.

सध्या सुरू असलेल्या कामांबाबत सर्वसामान्यांची तक्रार नाही. फक्त काही घटक आहेत ज्यांना हे नको आहे, असे विधान महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केले. पर्वरीतील मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

Babush Monserrate | Panaji Smart City
Mahadayi Water Dispute : कर्नाटकाचे पर्यावरण परवाने रोखणार! एजी देविदास पांगम

शहरातील बहुतांश भाग खोदण्यात आल्याने नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अनेक अपघातही झाले आहेत. पणजी शहर अधिक प्रगत व्हायचे असेल तर संयम बाळगण्याची गरज आहे. शहरातील विकासकामे ही नागिरकांसाठी केली जात आहेत. याचे फायदे नंतर दिसून येतील, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

तेलगळतीबाबत अहवाल मागवणार

गोवा मनोरंजन संस्थेच्या समोर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी तेल गळतीचा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. येथील मांडवी नदीच्या ठिकाणी तेल दिसले. याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होऊ शकतात.

याविषयी मोन्सेरात यांना प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, तेलगळतीबाबत उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवणार आहे. तेलगळती कोठून होत आहे, याची आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत चौकशी केली जाईल.

काही काळासाठी नोकरीवरून घरी पाठवलेल्या कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या ६ कोटी रुपयांच्या विषम निधीचा अधिक चांगला वापर झाला पाहिजे. यासाठी उपाय सुचविण्यासाठी कामगार खात्याने एक समिती स्थापन केली आहे. योजनांची व्याप्ती वाढविण्यावरही समिती लक्ष देईल.

- बाबूश मोन्सेरात, महसूलमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com