Dabolim Well Issue Dainik Gomantak
गोवा

दाबोळीतील विहिरीत पेट्रोलियम घटक; स्वयंपाकासाठीही पाण्याची चणचण! कारवाई तीव्र करण्याची पंचायत सदस्यांची मागणी

अज्ञात व्यक्तींविरुद्ध पेट्रोलियम पदार्थांनी विहीर दूषित करून जीवित व मालमत्ता धोक्यात आणल्याप्रकरणी तक्रार दाखल

Kavya Powar

Dabolim Well Issue: माटवे-दाबोळी येथील विहिरींतील पाण्याने पेट घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर विहिरींमध्ये ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थ असल्याचे आढळले.

याबाबत पंचायत सदस्य नीलम नाईक यांनी काल (शुक्रवारी) अज्ञात व्यक्तींविरुद्ध पेट्रोलियम पदार्थांनी विहीर दूषित करून जीवित व मालमत्ता धोक्यात आणल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

ज्या दिवशी हा प्रकार घडला त्यादिवशी त्वरित पोलीस, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन जवान दाखल होत घटनेची पाहणी केली. मात्र त्यानंतर चार दिवस उलटले तरी याबाबत पुढे काहीच झाले नाही. विहिरींमध्ये पेट्रोलियम घटक येण्याचा स्त्रोत शोधून काढला पाहिजे, असे नाईक यांनी सांगितले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, कंपनीकडून सुरू असलेल्या उत्खननाच्या कामावरही लक्ष ठेवावे आणि दोषींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा.

या प्रकरणात, पेट्रोलियम पदार्थांची चोरी झाली आहे की, खरेच पाईपलाईनची गळती झाली, याचा सखोल तपास करावा लागेल.

दाबोळीचे पाणी झुआरीनगर नाल्यात मिसळते आणि जर जास्त प्रमाणात गळती झाली तर नाफ्था दुर्घटनेसारखी आपत्ती ओढवू शकते. सध्या भागातील लोक स्वयंपाकासाठीही बाहेरून पाणी आणत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अधिक सक्रिय व्हायला हवे, अशी मागणी नाईक यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

Goa News Live: मोपा विमानतळावर सॅटेलाईट डिव्हाईस बाळगणाऱ्या रशियन नागरिकाविरोधात एका दिवसात गुन्हा आणि आरोपपत्र दाखल

SCROLL FOR NEXT