दाबोळीचा विकास स्थानिक आमदारांनी फक्त कागदावरच केला: तारा केरकर Dainik Gomantak
गोवा

दाबोळीचा विकास स्थानिक आमदारांनी फक्त कागदावरच केला: तारा केरकर

स्थानिक आमदारांनी विकासाच्या नावाने प्रसिद्धीच घेतल्याची प्रतिक्रिया मुरगावच्या (Murmugoa) माजी नगराध्यक्षा तथा समाजसेविका श्रीमती तारा केरकर यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

वास्को: दाबोळीचा विकास स्थानिक आमदारांनी फक्त कागदावरच केला असून, त्यांनी विकासाच्या नावाने प्रसिद्धी तेवढीच घेतल्याची प्रतिक्रिया मुरगावच्या (Murmugoa) माजी नगराध्यक्षा तथा समाजसेविका श्रीमती तारा केरकर यांनी दिली.

दाबोळीचा (Dabolim) विकास हा जनतेचा चांगल्या कार्यासाठी होणे गरजेचे होते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी ने गेल्या दहा वर्षात जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याची माहिती केरकर यांनी दिली. दाबोळी मतदारसंघातून मंगळवार (दि.२५) श्रीमती तारा केरकर यांनी अपक्ष उमेदवारी निर्वाचन अधिकारी शर्मिला गावकर यांच्याकडे सादर केला. मंगळवारी मुरगाव तालुक्यातून दाबोळीतून एकमेव उमेदवारी अर्ज तारा केरकर यांनी सादर केला. यावेळी बोलताना तारा केरकर म्हणाल्या की दाबोळी विकास कामापासून खूपच मागे राहिला आहे.

दाबोळीत स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतःचा तेवढाच विकास साधला असल्याची असल्याचा आरोप तारा केरकर यांनी केला. दाबोळीच्या विकासाला सर्वप्रथम प्राधान्य देणार असून या संपूर्ण दाभोळीत 'भू' गटार वाहिनी जोडून मोठा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. युवकांना या मतदार संघात किमान दोन मैदानी बांधून देणार. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती शेवटी तारा केरकर यांनी दिली.

दरम्यान मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातील दाबोळी मतदार संघातून आज एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.मुरगाव तालुक्यात तीन दिवसांत एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT