Dabolim Bogmalo Traffic Dainik Gomantak
गोवा

Dabolim Bogmalo: दाबोळी-बोगमाळो चौकात वाहतुकीचे तीनतेरा, बॅरिकेड्स हटवल्याने वाढले अपघात; जुन्या नव्या फलकांमुळे संभ्रम

Dabolim Bogmalo Traffic: दाबोळी-बोगमाळो चौकात उड्डाण पुलाच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करताना योग्य खबरदारी घेतली नसल्याने तेथे वाहनधारकांचा गोंधळ उडत आहे.

Sameer Panditrao

वास्को: दाबोळी-बोगमाळो चौकात उड्डाण पुलाच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करताना योग्य खबरदारी घेतली नसल्याने तेथे वाहनधारकांचा गोंधळ उडत आहे. तेथील बॅरिकेड्स हटवण्यात आल्याने पूर्वीच्या रस्त्यानेच बरेचजण वाहने हाकत आहेत. त्यामुळे सध्या येथे गोंधळाची स्थिती दिसून येत आहे.

उड्डाण पुलाचे खांब उभारण्यासाठी दाबोळी–बोगमाळो चौकातील वाहन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तेथील ट्रॉफिक सिग्नल्स हटवण्यात आले आहेत. बोगमाळोकडून येऊन वेर्णाकडे जाणऱ्या वाहनांच्या मार्गात करण्यात आला आहे. ही वाहने बोगमाळो येथून चौकात आल्यावर ती महामार्गावर येऊन पुढे वळण घेऊन वेर्णाकडे जातात.

पूर्वी ही वाहने चौकातूनच वळण घेऊन वेर्णा दिशेने जात होती. आता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असला, तरी काही वाहन चालक अद्याप अजूनही चौकातूनच वळण घेतात. त्यामुळे दाबोळी विमानतळ महामार्गाने येऊन बोगमाळोकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होतो. अचानकपणे वाहने चुकीच्या दिशेने आल्याने वाहनचालकांत गोंधळ उडतो. त्यामुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग उद्‍भवतात. तसेच वादावादीचेही प्रकार घडतात.

वाहतूक जैसे थे ठेवा

वाहतूक व्यवस्थेत बदल करताना येथील वाहतूक वळविण्यात आल्यासंबंधीचे फलक लावण्यात आले असले तरी जुने फलकही अद्याप तसेच आहेत. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो.

उड्डाण पुलाचा खांब उभारण्याचे काम पूर्ण झाल्याने तेथील बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा वाहतूक व्यवस्था जैसे थे ठेवण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.

ट्रॉफिक सिग्नल्स हटवण्यात आल्याने तेथे दिवसभर वाहतूक पोलिस तैनात करणे आवश्‍यक आहे.

खांब उभारण्यासाठी खोदकाम केल्याने तेथील झेब्रा क्रॉसिंगही गायब झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचण निर्माण होत आहे, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New GST Rate: जीएसटी कॉन्सिलचा मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के दोनच कर; काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर

Goa Politics: 'मग तुम्हीच तो DPR जनतेसमोर आणा!’ मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवरुन अमित पाटकरांचं सुदिन ढवळीकरांना थेट आव्हान

Viral Video: व्हायरल होण्याचा हव्यास ‘आंटींला' पडला भारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले,'हे रिलवाले...'

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT