Dabolim Traffic Issue
Dabolim Traffic Issue Dainik Gomantak
गोवा

Dabolim Traffic Issue: दाबोळी-बोगमाळो येथे बेशिस्त वाहतूक

गोमन्तक डिजिटल टीम

Dabolim Traffic Issue

दाबोळी-बोगमाळो चौकातून बोगमाळोकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या फ्लेक्झिबल स्प्रिंग पोल रस्त्यावर आडवे झाल्याने तसेच काही गायब झाल्याने तेथे काही वाहनचालकांकडून बेशिस्तरित्या वाहने हाकलत आहेत.

त्यामुळे इतर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. येथे तात्पुरत्या स्वरूपाच्या बॅरिअर उभारण्याऐवजी कायमस्वरूपी दुभाजक उभारण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

या चौकात ट्रॉफिक सिग्नल्स आहेत. तथापि मडगावहून येणारे काही वाहनचालक तांबडा सिग्नल्स असताना डाव्या बाजूने वाहने वळवून आडवाटेने वाहने पुढे काढीत होते. त्यामुळे बोगमाळोकडून येणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. त्याप्रमाणे काही वेळा येथे अपघाताच्या घटना घडल्या होत्या.

चौकापासून सुमारे शंभर मीटर्सपर्यंत एका बाजूला चारचाकी वाहने उभी करण्यास प्रतिबंध असताना तेथे चारचाकी व सहाचाकी वाहने उभी करण्यात येत होती. याप्रकरणी वास्को वाहतूक पोलिस कक्षाने दखल घेताना जी-२० च्या वेळी या रस्त्याच्या मधोमध फ्लेक्झिबल स्प्रिंग पोल उभारले होते. त्यामुळे तेथे वाहनचालकांमध्ये शिस्त आली होती.

आडवाटेने वाहने पुढे दामटण्याचे प्रकार बंद झाले होते. तेथे रस्त्याकडेला चारचाकी वाहने उभी करणाऱ्यांना तालांव दिल्याने कोणीही तेथे चारचाकी वाहने उभी करीत नव्हते. परंतु आता तेथे चारचाकी वाहने उभी करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे बस, ट्रक व इतर वाहनांना अडथळा निर्माण होऊ लागल्याने वाहने या पोलवरून जाऊ लागल्याने हे पोल रस्त्यावर आडवे होऊ लागले.

या भागात फ्लेक्झिबल स्पिंग पोलऐवजी तेथे सिमेंटचे ब्लॉक मधोमध उभारण्याचा प्रस्ताव होता. परंतु तो कधी अमलात येतो हे अद्याप उघड झाले नाही. त्यामुळे सध्या येथे काही वाहनचालकांचा बेशिस्तपणा पाहण्यास मिळतो. येथे रस्त्याच्या एका बाजूला नो पार्किंग असताना मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने उभी केली जातात. हे प्रकार बंद होण्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे. या गोष्टींकडे वास्को वाहतूक पोलिस लक्ष देतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT