Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळीवर विमाने, पर्यटक घटले! विधानसभेत CM सावंतांच्या उत्तरातून आकडेवारी समोर

Dabolim Airport Tourists: दाबोळी विमानतळावर येणारी विमाने पर्यटकांच्‍या संख्‍येत गतवर्षीही घट झाल्‍याचे मुख्‍यमंत्री सावंत यांनी विधानसभेतील सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दाबोळी विमानतळावर येणारी विमाने आणि देशी-विदेशी पर्यटकांच्‍या संख्‍येत गतवर्षीही घट झाल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे. आमदार संकल्‍प आमोणकर यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून दाबोळी विमानतळावर येणारी विमाने आणि प्रवाशांत घट झाली आहे का? जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी दाबोळी विमानतळावर किती विमाने आणि प्रवासी आले? विमान कंपन्या आपले कामकाज दाबोळी विमानतळावरून मोपा विमानतळावर स्थलांतरित करत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे का?

तसे असल्‍यास आतापर्यंत स्थलांतरित झालेल्या विमान कंपन्यांची संख्या किती आहे? दाबोळी विमानतळावरील हवाई वाहतुकीत होत असलेल्या घटीबद्दल चिंता व्यक्त करणारी निवेदने सरकारला विमान कंपन्या, पर्यटन संस्था, उद्योग संघटना किंवा स्थानिक व्यापारी मंडळांकडून प्राप्त झाली आहेत का?

असे प्रश्‍‍न आमदार आमोणकर यांनी विचारले होते. त्‍यावर उत्तरातून मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी जी आकडेवारी सादर केलेली आहे, त्‍यातून गेली तीन वर्षे दाबोळीवर येणारी विमाने तसेच देशी–विदेशी पर्यटकांतही घट होत असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

दरम्‍यान, दाबोळी विमानतळावरील हवाई वाहतुकीत होत असलेल्या घटीबद्दल चिंता व्यक्त करणारे एकही निवेदन आतापर्यंत विमान कंपन्या, पर्यटन संस्था, उद्योग संघटना किंवा स्थानिक व्यापारी मंडळांकडून सरकारला प्राप्‍त झालेले नाही, असेही मुख्‍यमंत्र्यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

आलेली विमाने

वर्ष संख्‍या

२०२३ ४८,१९५

२०२४ ४३,७४७

२०२५ ३७,३०६

(नोव्‍हेंबरपर्यंत)

आलेले पर्यटक

वर्ष देशी विदेशी

२०२३ ६९,५५,३१३ ४,८१,९१३

२०२४ ६७,४१,४१५ ३,०२,१३०

२०२५ ५७,७४,२८४ १,८४,८६४

(नोव्‍हेंबरपर्यंत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NH66 Highway Goa: राष्ट्रीय महामार्ग 66 बाबत नवीन अपडेट! रुंदीकरणाचे काम होणार सुरु; 764 कोटी मंजूर

Terror Attack: 'या' इस्लामिक देशात नरसंहार! 31 निष्पाप नागरिकांची गोळ्या झाडून हत्या; लष्करी राजवटीत हिंसाचाराचा उद्रेक

Goa Russian Murder: एकाच नावाच्या दोन रशियन महिलांची का केली हत्या? मारेकऱ्याच्या आईशी कनेक्शन! खुनाचं गुढ उकललं!

Goa Accident: मद्यधुंद कारचालकाने दिली मांडवी पुलावर धडक! तिघे जखमी, एकाचा मृत्यू; संशयिताविरुध्द सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्‍चित

"पांडुरंग हरी"! गोव्यात पहिल्यांदाच होणार विठ्ठल रखुमाई शाही विवाह सोहळा; म्हापशातील देवस्थानात रंगणार शतकोत्सव कार्यक्रम

SCROLL FOR NEXT