Dabolim Airport Touts: गुपचूप प्लॅन, धडाकेबाज ॲक्शन! दाबोळी विमानतळावर 20 दलालांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पळणाऱ्यांची धरपकड सुरु

Goa Police Crackdown On Dabolim Airport Touts: दाबोळी विमानतळावर हैदोस घालणाऱ्या या दलालांविरोधात कारवाई केल्याने युनायटेड टॅक्सीमॅन असोसिएशनाने समाधान व्यक्त केले.
Goa Police Crackdown On Dabolim Airport Touts
Dabolim Airport ToutsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बुधवारी (24 डिसेंबर) रात्री दाबोळी विमानतळावर कारवाई करताना सुमारे वीस दलालांना ताब्यात घेतले. पोलिस कारवाईची कुणकुण लागल्याने काही दलालांनी तेथून पळ काढला. दरम्यान, ही कारवाई चालूच राहणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) हैदोस घालणाऱ्या या दलालांविरोधात कारवाई केल्याने युनायटेड टॅक्सीमॅन असोसिएशनाने समाधान व्यक्त केले. तसेच या दलालांची सखोल चौकशी करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. या दलालांपैकी काही गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने त्यांना वेळीच प्रतिबंध घालण्याची गरज असोसिएशनने व्यक्त केली आहे.

Goa Police Crackdown On Dabolim Airport Touts
Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

दाबोळी विमानतळावर गेल्या काही महिन्यांपासून दलालांची संख्या झपाट्याने वाढली होती. शंभरच्या आसपास असणाऱ्या या दलालांनी युनायटेड ट्रक्सीमॅन असोसिएशन व दाबोळी विमानतळ पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. या दलालांच्या वावराला आवर घालण्यास तेथील यंत्रणा असमर्थ ठरली होती. हे दलाल दाबोळी विमानतळावरील टॅक्सीवाल्यांचे ग्राहक पळवीत होते. वास्कोबाहेरून विमानतळावर प्रवाशांना घेऊन येणाऱ्या काही टूरिस्ट टॅक्सीवाल्यांकडे या दलालांनी संगनमत करून आपला अवैध व्यवसाय चालवला होता.

टूरिस्ट टॅक्सीवाल्यांनी विमानतळावर प्रवाशांना सोडल्यावर त्यांनी तेथून प्रवासी न घेता परतण्याची गरज असते. मात्र ते दलालांच्या मदतीने प्रवासी मिळवितात. त्या बदल्यात दलाल मोठे कमिशन घेतात. या एकंदर व्यवहारामुळे टूरिस्ट टॅक्सीवाल्याचा व दलालांची कमाई होत होती. मात्र यामुळे युनायटेड टॅक्सीमॅन असोसिएशनच्या सदस्यांना प्रवाशाविना ताटकळत राहावे लागत होते. त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होऊ लागल्याने या दलालांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत होती. याबाबत पोलिस अधिकारी, मंत्री आदींना कल्पना देण्यात आली होती. मात्र थातूरमातूर कारवाईनंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार सुरू होता. त्यामुळे टॅक्सीवाल्यांमध्ये नाराज होते.

Goa Police Crackdown On Dabolim Airport Touts
Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरून प्रवाशांची वाहतूक पूर्ववत, 'इंडिगो' प्रकरणानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरण दक्ष

आता नाताळ व नवे वर्षानिमित्त पर्यटक गोव्यात (Goa) येण्यास आरंभ झाल्याने विमानतळ परिसरात दलालांची संख्या वाढली होती. याबाबत असोसिएशनने तक्रार केल्यानंतर उपअधीक्षक कदम यांनी या दलालांविरोधात कारवाई हाती घेतली आहे. कदम यांनी वास्कोचे पोलिस निरीक्षक वैभव नाईक, दाबोळी विमानतळा पोलिस स्थानकाचे जॉन फर्नांडिस तसेच काही उपनिरीक्षक व पोलिस शिपाई यांच्या मदतीने बुधवारी धडक कारवाई केली. या कारवाईबाबत पूर्ण गुप्तता बाळगण्यात आली होती, मात्र काही दलालांना कुणकुण लागल्याने त्यांनी तेथून पळ काढला.

दलाल वाढण्याचे कारण काय?

दाबोळी विमानतळावर पोलिस स्थानक असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दलालांची संख्या वाढण्यामागील कारण काय हे कोडे नागरिकांना व टॅक्सीवाल्यांना पडले आहे. त्या दलालांविरोधात कारवाई न होण्यामागील गुपित उघड असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यापूर्वी गुरुदास कदम हे दाबोळी विमानतळाचे निरीक्षक असताना त्यांनी या दलालांना आळा घातला होता.

Goa Police Crackdown On Dabolim Airport Touts
Dabolim Airport: दाबोळी विमानतळासाठी 255 कोटी! केंद्राकडून निधी मंजूर; विमानोड्डाणमंत्री रुडींनी दिली माहिती

दाबोळी विमानतळावरील दलालांसंबंधीची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या कानावर घालण्यात आली होती. त्यांनी याप्रकरणी दखल घेऊन पोलिसांनी निर्देश दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आल्याने असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश मयेकर व , सरचिटणीस प्रसाद प्रभुगावकर व इतरांनी गुदिन्हो यांचे आभार मानले. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com