Dabolim Dainik Gomantak
गोवा

Dabolim News : दाबोळीपुढे आता कारवारचेही आव्हान! नौदलाचा प्रकल्प येतोय आकाराला

गोमन्तक डिजिटल टीम

अवित बगळे

पणजी, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाने दाबोळी विमानतळाचे प्रवासी पळविल्यानंतर आता कारवार येथील विमानतळही दाबोळीचे प्रवासी पळविण्यासाठी सज्ज होत आहे. नौदलाच्या आयएनएस कदंब या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आता नागरी विमानोड्डाणाची सोय असणारा नौदलाचा हवाई तळ आकाराला येणार आहे.

दाबोळी विमानतळ म्हणून ओळखला जाणारा विमानतळ हा प्रत्यक्षात आयएनएस हंस या नौदल तळाचा भाग आहे. धावपट्टीवर नौदलाचा ताबा आहे तर नागरी प्रवाशांना ये-जा करणे सुकर व्हावे यासाठी भारतीय विमान प्राधिकरणाने एक इमारत तेथे बांधली आहे. तशीच व्यवस्था कारवार येथील तळावर करण्यात येणार आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि नौदल प्रमुख आर. हरी कुमार यांनी गेल्या आठवड्यात कारवारचा दौरा केल्यानंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी हुबळी येथे झालेल्या एका परिषदेवेळी उद्योजकांकडून कारवार परिसरामध्ये एखादा विमानतळ कर्नाटक सरकारने बांधावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत विमानतळ विकसित करण्याची शक्यता पडताळून पाहू, असे आश्वासन दिले होते.

कारवारपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंकोला परिसरामध्ये यासाठी जागांची पाहणीही करण्यात आली होती. मात्र, तो प्रस्ताव पुढे सरकलेला नव्हता.

आयएनएस कदंब प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात लढाऊ विमाने ये-जा करण्यासाठी सोयीची ठरण्यासाठी धावपट्टी बांधण्याचा प्रस्ताव नौदलासमोर ठेवला होता. त्या मागणीला जनतेच्या मागणीची जोड देऊन आता कारवारच्या नौदल तळावर आकाराला येणाऱ्या हवाई तळातच नागरी प्रवाशांची ये-जा करण्याची सोय केली जाणार आहे.

दाबोळी विमानतळावर उतरू शकणारी सर्व विमाने कारवार येथे उतरू शकतील; कारण दाबोळीएवढीच धावपट्टी तेथेही बांधण्याचे नियोजन असल्याची माहिती मिळाली आहे.

मोठा परिणाम जाणवणार!

दाबोळी विमानतळाचा वापर कर्नाटकातील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, यल्लापूर, सागर, शिमोगा आदी जिल्ह्यांतील हजारो लोक विदेशात ये-जा करण्यासाठी करतात. त्यांना कर्नाटकातील सर्वात जवळचा विमानतळ मंगळुरू येथे आहे.

त्याऐवजी ते दाबोळी विमानतळाला पसंती देतात. अशा प्रवाशांची संख्या मोठी असल्याकारणाने कारवारला विमानतळ झाल्यानंतर त्याचा फटका दाबोळी विमानतळाला बसू शकतो.

चार वर्षांत उभारणी

नौदलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवारमधील नौदलाच्या हवाई तळावर नागरी विमानांची ये-जा करण्याची सोय करावी, अशी औपचारिक विनंती कर्नाटक सरकारने संरक्षण मंत्रालयाला केली आहे. १ हजार ३२८ एकर जमिनीवर हा नौदलाचा हवाई तळ आकाराला येईल. त्यावर २ हजार ७०० मीटरची धावपट्टी असेल. कामाचे आदेश दिल्यापासून चार वर्षांत हा हवाई तळ उभारला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT