पणजी: पर्यटन हंगामात यंदा ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दाबोळी विमानतळावर सुमारे १४४ आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमाने दाखल होणार आहेत. वर्ष २०२६-२७च्या पर्यटन हंगामातील पहिले आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमान ३० सप्टेंबर रोजी दाबोळी विमानतळावर दाखल होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
या चार्टर्ड विमानसेवांच्या माध्यमातून सुमारे २६ हजार परदेशी पर्यटक गोव्यात येण्याचा अंदाज आहे. ३० सप्टेंबर रोजी रशियाची ‘एरोफ्लॉट’ एअरलाइन्स १८० प्रवाशांना घेऊन दाबोळी विमानतळावर दाखल होणार आहे. संपूर्ण पर्यटन हंगामात ‘एरोफ्लॉट’कडून दाबोळीसाठी एकूण ९६ चार्टर्ड फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
रशियन पर्यटकांसोबतच यंदा कझाकस्तानमधूनही मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात येण्याची अपेक्षा आहे. कझाकस्तानची ‘स्कॅट एअरलाइन्स’ ऑक्टोबरपासून दाबोळीसाठी चार्टर्ड सेवा सुरू करणार असून, या एअरलाइन्सच्या सुमारे ४८ चार्टर्ड फेऱ्या दाबोळी विमानतळावर दाखल होतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.