Francisco Sardinha
Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

Goa Airport : दाबोळी विमानतळ सुरळीतपणे चालूच राहणार : फ्रान्सिस सार्दिन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Airport : दाबोळी विमानतळ बंद होण्यासंबंधी वावड्या उडवल्या जात आहेत. मात्र दाबोळी विमानतळ सुरळीतपणे चालूच राहणार आहे, यात तिळमात्र शंकाच नाही. तेथे भविष्यात मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे दक्षिण गोवा खासदर तथा दाबोळी विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांनी स्पष्ट केले.

सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी सकाळी दाबोळी विमानतळावर झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी दाबोळी विमानतळाचे संचालक धनजंय राव, उद्योजक नाना बांदेकर तसेच इतर संबंधित उपस्थित होते. या बैठकीनंतर सार्दिन यांनी पत्रकारांना माहिती दिली.

दाबोळी विमातळाची गेल्या काही वर्षांमध्ये झालेली प्रगती व विकास पाहता कोणी दाबोळी विमानतळ बंद होईल असा विचारही करू नये. या विमानतळावर येणाऱ्या काळात दोन 'एअरोब्रिज' बांधण्यात येणार आहेत.

देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान सेवांसंबंधी अधिक सुविधा देण्यात येणार आहेत. विमानतळावरील कँटीन तसेच इतर खाद्य पदार्थ दुकानांचा विस्तार करण्यात येणार आहे.

त्यासाठी डोमेस्टिक भागात 160 चौरस मीटर जागा तर आंतरराष्ट्रीय भागात 200 चौरस मीटर जागा विस्तारित करण्यात येणार आहे. जेणेकरून प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होतील, असे खासदार सार्दिन म्हणाले.

विमानतळावर काही वेळा विमानांना विलंब होतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आराम करण्यासाठी आर्म चेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दाबोळी विमानतळावरील पार्किंग व्यवस्थेसाठी लवकरच पोलीस अधिकारी, विमानतळ अधिकारी यांची बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यात येईल, असे खासदार सार्दिन यांनी सांगितले.

एनआरबी ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख वास्कोस्थित उद्योगपती आणि परोपकारी नारायण बांदेकर यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या सर्व प्रवासासाठी दाबोळी विमानतळ वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT